Robbery Video: गेल्या अनेक वर्षांत चोरीच्या घटनांत वाढ होत चालली आहे. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. एवढंच नाही तर चप्पलदेखील चोरायला चोर मागे पुढे पाहत नाहीत. चोरीच्या घटनांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या अशीच एक घटना एका ठिकाणी घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेत पती-पत्नीने मिळून चपलेची चोरी केली आहे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!

हैदराबाद भागातील एका पती-पत्नीच्या जोडीला जवळपासच्या घरांतून डझनभर बुटांची चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. शंकर नावाचा हा माणूस नियमितपणे घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये घुसून चांगल्या दर्जाच्या चपलेची चोरी करायचा आणि उप्पल येथील त्याच्या निवासस्थानी जमा करायचा. नंतर हे जोडपे चोरी केलेल्या चपलेतून पैसे कमवण्यासाठी स्थानिक बाजारपेठेतील रस्त्यावरील विक्रेत्यांना विकायचे.

हेही वाचा… “माझ्या कारचा नंबर घे आणि…”, कारचालकाने दिली धमकी आणि केली शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

संशयावरून रहिवाशांनी टाकला छापा

चप्पल नियमितपणे गायब होत असल्यामुळे घरातून कोणीतरी नियमितपणे चोरी करत असल्याचे स्थानिकांना समजले. संशयावरून उप्पल वसाहतीतील रहिवासी शंकरच्या घरी गेले तेव्हा चपलांचे ढीग पाहून ते थक्क झाले. शंकर आणि त्याच्या पत्नीला रंगेहात पकडण्यासाठी त्यांनी ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली.

जोडप्याने चोरीचे बूट स्थानिक बाजारात विकल्याचा अहवाल

या चपला हा पुरुष घरातून आणि मंदिरांतून लुटायचा अशी माहिती समोर आल्यावर पत्नीने तिच्या पतीच्या कामांना पूर्ण पाठिंबा दिला आणि जवळच्या बाजारात वस्तूंची विक्री करण्यात मदत केली असे समजले. रहिवाशांनी शंकरच्या घरात प्रवेश केला तेव्हा त्याची पत्नी चपलांची पोती उघडून जमिनीवर टाकताना दिसली, तेव्हाच ती गुन्ह्यात भागीदार असल्याचे त्यांना समजले.

हेही वाचा… त्यांना मोह आवरला नाही अन्…, भर कॉन्सर्टमध्ये कपलने केलं किस, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा VIDEO होतोय VIRAL

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @jsuryareddy या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader