ग्राहकाला जबरदस्ती पिशवी देणं एका पिझ्झा आऊटलेटला चांगलंच महागात पडलं आहे. ग्राहक मंचाने त्यांना ११ हजारांचा दंड ठोठावला आहे. पिझ्झा आऊटलेटमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाची इच्छा नसतानाही त्याला लोगो असणारी पिशवी घेण्यास भाग पाडलं होतं. या पिशवीसाठी त्यांनी सात रुपये ६२ पैसे आकारले होते.

के मुरली कुमार या विद्यार्थ्याने ग्राहक मंचाकडे पिझ्झा आऊटलेटविरोधात तक्रार केली होती. कुमारने १६ सप्टेंबर २०१९ ला घरी नेण्यासाठी पिझ्झाची ऑर्डर दिली होती. मात्र यावेळी त्याला प्लास्टिक पिशवीसाठी अतिरिक्त सात रुपये ६२ पैसे आकारण्यात आले. विद्यार्थ्याने पिझ्झा आऊटलेमुळे आपल्याला मानसिक त्रास झाल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र त्यांनी सर्व आरोप नाकारले होते.

दोन वर्ष या प्रकरणी खटला सुरु होता. अखेर दोन वर्षांनी ग्राहक मंचाने निकाल दिला असून ११ हजारांचा दंड ठोठावला आहे.