Viral video: ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा वाहतूकाचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात. अशावेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात. दरम्यान आता पुन्हा एका वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत. हैद्राबादमध्ये एका महिलेने वाहतुकीचा नियम मोडला. त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्याद कैद झाले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये एक महिला रस्त्याच्या मधोमध पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला कार चालक रस्त्याच्या मधोमध पोलीस कर्मचारी आणि इतर लोकांशी वाद घालताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून स्पष्ट होते की महिलेकडे जॅग्वार कार आहे आणि तिला चुकीच्या बाजूने गाडी चालवल्याबद्दल पोलिसांनी पकडले आहे. यादरम्यान महिला इतर लोकही चुकीच्या बाजूने गाडी चालवत आहेत, मी एकटीच नाही, असे म्हणत पोलिसांना प्रतिउत्तर देत आहे. त्यानंतर महिलेने विघ्नेश नावाच्या ट्रॅफिक होमगार्डला तिच्या गाडीचा फोटो काढून तिला जाऊ देण्यास सांगितले.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

फ्री प्रेस जर्नलनुसार, व्हिडिओ शूट करताना महिलेने ट्रॅफिक होमगार्डसोबत गैरवर्तन केले आणि शिवीगाळही केली. या महिलेचे नाव श्रीलता असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेदरम्यान इतर अनेक लोक मध्यस्थी करण्यासाठी आले पण श्रीलता गप्प बसली नाही. @Teluguscribe नावाच्या एक्स अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल

या प्रकरणी महिलेवर बंजारा हिल्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक पोलिसांशी घातलेली हुज्जत पाहून अनेकांनी महिलेवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली.