गुजरात सरकारमधील निवृत्त कर्मचारी असणाऱ्या रमेशचंद्रा फेफार यांनी आपण विष्णूचा शेवटचा अवतार म्हणजेल कालकी अवतार असल्याचं म्हटलं आहे. निवृत्तीआधीच कार्यालयामध्ये बराच काळ गैरहजर राहिल्याने त्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता त्यांनी ग्रॅच्युअटीची मागणी करत लवकरात लवकर ही रक्कम देण्यास सरकारला सांगितलं आहे. आपल्याला लवकरात लवकर ही रक्कम मिळाली नाही तर दैवी शक्तींचा वापर करुन मी जगभरातील अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करेन, असा धमकी वजा इशारा त्यांनी दिलाय. फेफार हे नोकरीवर बराच काळ गैरहजर असल्याचं निष्पण्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीवरुन सक्तीची निवृत्ती देण्यात आलेली.

नक्की वाचा >> गजा गेला… ‘इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स’ने नोंद घेतलेल्या सांगलीमधील बैलाचं निधन

१ जुलै रोजी फेफार यांनी जलसंवर्धन विभागाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रामध्ये, “सरकारमध्ये दानव बसले आहेत,” असा उल्लेख असून ते मला छळत आहेत, असं म्हटलं आहे. माझी १६ लाखांची ग्रॅच्युअटीची रक्कम त्यांनी आडवून ठेवली आहे. तसेच माझी एका वर्षांची १६ लाखाची पगाराची रक्कमही मला देण्यात आलेली नाही, असं फेफार यांनी म्हटलं आहे. या छळाच्या बदल्यात आपण जगभरामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करु. आपण विष्णुचा दहावा अवतार आहे, असा दावा फेफार यांनी केलाय. हिंदू मान्यतांनुसार विष्णूच्या शेवटच्या अवताराने सतयुगामध्ये राज्य केलं होतं. फेफार यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नक्की पाहा >> Photos: अबब… काही किलोमीटरपर्यंत पसलं आहे हे कोळ्यांचं जाळं; जाणून घ्या नक्की काय घडलंय

गुजरातच्या जलसंवर्धन विभागाच्या वतीने सरदार सरोवर पुन:वर्सन या प्रकल्पामध्ये फेफार हे सुप्रिटंडन्ट इंजिनियर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं. या विभागाकडे नर्मदा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या स्थानिकांच्या पुन:वर्सनाची जबाबदारी देण्यात आली होती. २०१८ साली फेफार यांनी ८ महिन्यांमध्ये केवळ १६ दिवस कार्यालयात हजेरी लावल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. “फेफार यांनी कार्यालयात उपस्थित न राहता आता वेतनाची मागणी केलीय. आपण विष्णूचा कालकी अवतार असून आपण पृथ्वीवर पाऊस पाडण्याचं काम करत असल्याने आपल्याला वेतन देण्यात यावं, अशी त्यांची मागणी आहे,” असं जलसंवर्धन विभागाचे सचिव एम. के. जाधव यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> पोलीस, सरकारी अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून गोव्यातील Nightlife ची ओळख असणारा क्लब मालकाने विकला

“ते काहीही बडबडत असतात. त्यांनी एका वर्षाचं वेतन आणि ग्रॅच्युअटीची मागणी करणारं त्यांचं एक पत्र मिळालं आहे. त्यांच्या ग्रॅच्युअटीसंदर्भात काम सुरु आहे. त्यांनी आपण देवाचा अवतार असल्याचं सांगितल्यानंतर मागील वर्षी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांची मानसिक स्थिती लक्षात घेता सरकारने त्यांना वेळेआधी निवृत्ती घेण्यासही परवानगी दिली. सामान्यपणे चौकशी सुरु असतानाच अशा निवृत्तीला परवानगी दिली जात नाही. मात्र फेफार यांच्या प्रकरणात विशेष केस म्हणून सवलत देण्यात आली,” असं जाधव यांनी सांगितलं.

मागील दोन दशकांमध्ये भारतामध्ये समाधानकारक पाऊस पडला याचा आपल्यातील दैवीशक्ती जबाबदार असल्याचंही फेफार यांनी म्हटलं आहे. “मागील बऱ्याच काळापासून देशात दुष्काळ नाहीय. चांगल्या पावसामुळे भारताला मागील २० वर्षांमध्ये २० लाख कोटींचा नफा झालाय. असं असूनही सरकारमध्ये बसलेले दानव मला त्रास देत आहे. त्यामुळेच यंदा मी जगभरामध्ये दुष्काळ निर्माण करणार आहे. मी विष्णूचा दहावा अवतार असून सतयुगामध्ये मीच जगावर राज्य करतोय,” असं फेफार या पत्रात म्हटलेत.