तंत्रज्ञानाने आपले जीवन जितके सोपे केले आहे, तितकेच नवीन धोकेही समोर आणले आहेत. आपल्याला हवे ते आपण लगेच ऑर्डर करतो. स्विगी आणि झोमॅटो ही आपल्यासाठी आता रोजचीच गोष्ट झाली आहे. म्हणूनच बाजारात अशी अनेक अ‍ॅप्स आहेत, ज्यांच्या मदतीने आपण घरबसल्या छोट्या-छोट्या गोष्टी मिळवतो. पण एकीकडे सवलत मिळत असतानाच, अनोळखी व्यक्तींनाही आपली वैयक्तिक माहिती मिळते. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच एका महिलेने स्विगी एजंटकडून छळ झाल्याची घटना सोशल मीडियावर शेअर केली, त्यानंतर तिचे ट्विट व्हायरल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी, @prapthi_m या ट्विटर वापरकर्तीने व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि म्हणाली, “मला खात्री आहे की इथल्या अनेक महिलांना या समस्येचा सामना करावा लागला असेल. मला मंगळवारी रात्री @SwiggyInstamart कडून किराणा मालाची डिलिव्हरी मिळाली. आज डिलिव्हरी बॉयने मला व्हॉट्सअॅपवर भयानक मेसेज पाठवले. असे काही पहिल्यांदाच नाही, ना शेवटच्या वेळी.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

(Photo : Twitter/@prapthi_m)
(Photo : Twitter/@prapthi_m)

व्हायरल चॅट्समध्ये दिसत आहे की हाय लिहून मेसेज पाठवला आहे, त्यानंतर महिलेने विचारले कोण आहे? प्रत्युत्तरात, डिलिव्हरी एजंट लिहितो की तुमची हरकत नसेल तर… मला तुमची खूप आठवण येत आहे. त्यानंतर तो त्वरित आणखी संदेश पाठवतो. तुमचे सौंदर्य, वागणूक, डोळे इत्यादी खूप छान आहेत असे तो लिहितो. शेवटी तो लिहतो, या सगळ्यांना माझी आठवण येते.

(Photo : Twitter/@prapthi_m)

तिच्या ट्विट थ्रेडनुसार, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हकडून त्याचा छळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र यावेळी तिने ही बाब सर्वांसमोर आणण्याचे ठरवले आणि सेवा पुरवठादाराकडे तक्रारही केली. मात्र त्यांच्याकडून एकच उत्तर आले की डिलिव्हरी पार्टनरवर कडक कारवाई करू.

(Photo : Twitter/@prapthi_m)

तिच्या ट्विटला शेकडो लाइक्स मिळाले आहेत. तसेच, युजर्स या प्रकारावर ते संताप व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I miss you so much delivery boy message to woman on whatsapp goes viral on social media pvp
First published on: 20-06-2022 at 16:46 IST