Transgender Dance Viral Video: सोशल मीडियावर रोज डान्सचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण मोजके व्हिडिओ असे असतात जे नेटकऱ्यांचे मन जिंकतात. असाच एक सुंदर व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील आहे जिथे एक तृतीयपंथी व्यक्ती नृत्य करताना दिसत आहे. तृतीयपंथीने नऊवारी साडी नेसून अफलातून लावणी नृत्य केले आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. अनेकांनी तृतीयपंथीच्या नृत्याचे कौतुक केले आहे.

तृतीयपंथीने लोकल ट्रेनमध्ये सादर केली लावणी!

सोशल मीडियावर विविध वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की नृत्य सुरू करण्यापूर्वी, तृतीयपंथी सांगत आहे, “मी ट्रेनमध्ये टाळ्या वाजवून भीक मागत नाही. मला माझी प्रतिभा दाखवायची आहे. त्यानंतर ते नृत्य सादर करतात. नृत्य इतके सुंदरपणे सादर केले आहे की प्रवासी पाहतच राहिले.”

तृतीयपंथीचे भाव, आत्मविश्वास आणि अभिनय इतके प्रभावी आहेत की व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लोक केवळ त्याच्या नृत्याचेच नव्हे तर तिच्या स्वाभिमानाचे आणि कठोर परिश्रमाचेही कौतुक करत आहेत.

व्हिडिओवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. बरेच वापरकर्ते लिहित आहेत की या तृतीयपंथाने हे सिद्ध केले आहे की,
“जर त्यांच्यात हिंमत आणि कौशल्य असेल तर कोणीही स्वत:हून सन्माननीय जीवन जगू शकते. काहींनी म्हटले आहे की,”समाजाने अशा लोकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, त्यांना दुर्लक्षित करण्याची नाही.”

अनेक लोकांनी हा प्रेरणादायी व्हिडिओ असल्याचे म्हटले. काहींनी या समाजात प्रश्न उठवले कि, तृतीयपंथी समाजाच्या कला आणि प्रतिभा खरी ओळख अखेर कधी मिळणार? मुंबईतील लोकलमध्ये अनेक कलाकार सादर करतात, या तृतीयपंथीचा व्हिडिओ वेगळा आहे कारण ते स्वत:च्या आत्मसन्मानासाठी आवाज उठवला आहे.

ते सांगतात की, मी टाळी वाजवून भीक मागणार नाही, समाजात पसरलेल्या जुन्या दृष्टिकोनावर आव्हान देत आहे कारण तृतीयपंथी समाजाला नेहमी टाळी वाजवून पैसे मागण्यास भाग पाडले जाते. हा व्हिडिओ फक्त एक डान्स परफॉर्मन्स नाही तर संदेश देत आहे की, प्रत्येक व्यक्ती आपल्या कलेच्या जोरावर पुढे जाऊ शकतो आणि मान-सन्मान करू शकतो.

सोशल मीडियावर होणारे कौतुक दर्शवते की लोक नवीन बदलासाठी तयार आहेत आणि कौशल्याला सन्मान देण्यामध्ये आता मागे हटत नाही. तृतीयपंथी समजासाठी या व्हिडिओ एक आशेचा किरण आहे जो दर्शवितो कि समाजाचा दृष्टीकोन हळू हळू सकारात्मक दिशेने बदलत आहे.