scorecardresearch

वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यातील ‘तो’ फोटो व्हायरल होताच प्रवाशांनी व्यक्त केला संताप

व्हायरल होणारा फोटो पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियांद्वारे संताप व्यक्त करताना दिसत आहेत

Vande Bharat Express
सध्या वंदे भारत एक्सप्रेसशी संबंधित अनेक घडामोडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo : Twitter)

भरधाव वेगाने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड दर्जाची स्वदेशी ट्रेन म्हणून ओळखली जाते. सध्या वंदे भारत एक्सप्रेसशी संबंधित अनेक घडामोडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये काही अपघातांच्या तर काही सेल्फीच्या नादात एका प्रवाशाला इच्छा नसताना १५० किलोमीटरचा प्रवास करायला लागला होता याबाबतच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आणि पाहिल्या आहेत.

अशातच आता वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्यात कचरा पसरल्याचा एक फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करताना दिसत आहेत. कोणी हे प्रवाशांचं गैरवर्तन असल्याचं म्हणत आहे. तर कोणी रेल्वे प्रशासनाचा ढीम्म कारभाराचे हे उदाहरणं असल्याचं म्हणत आहे हा फोटो IAS अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

हेही पाहा- Video: “पोऱ्या तुझं वागणं योग्य नाही” म्हणत सर मला लोकशाहीच्या मुल्यांप्रमाणे पायदळी तुडवतात; चिमुकल्याचे तुफान भाषण ऐकाच

IAS अधिकाऱ्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ट्रेनच्या डब्यात इतरत्र पडलेल्या रिकाम्या बाटल्या, वापरलेले जेवणाचे कंटेनर आणि प्लास्टिकच्या पिशव्या दिसत आहेत. शिवाय यावेळी तिथे साफसफाई करण्यासाठी एक कामगार हातात झाडू धरुन उभा असल्याचंही दिसत आहे. हा फोटो शेअर करताना आयएएस ऑफिसर यांनी कॅप्शनमध्ये “आम्ही लोक” असं लिहिलं आहे.

हेही पाहा- Uber ड्रायव्हरने दिला असा रिप्लाई, महिलेला कॅबची बुकिंग रद्द करावी लागली; वाचून तुम्हीही थक्क व्हाल

या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिलं आहे, “सर, आपल्या देशात लोकांना त्यांचे कर्तव्य माहित नाही, पण हक्क माहीत आहेत.” तर आणखी एका वापरकर्त्याने लोकांनीच स्वच्छतेसाठी स्वत:चे योगदान देण्याच्या दिशेने पावले टाकायला हवीत असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे, ‘सर वंदे भारत किंवा अशा कोणत्याही ट्रेनमध्ये जेवण देण्यासाठी कर्मचारी असतात, जेवल्यानंतर ते स्वच्छ करतात आणि सीटवरूनच जेवल्यानंतर ट्रे घेतात, जेवल्यानंतर कोणी फेकायला जात नाही, मी देखील या ट्रेनमध्ये अनेकदा प्रवास केला आहे.’

अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ट्विटवर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये कोणी रेल्वे कर्मचाऱ्यांना दोष देत आहे. तर कोणी प्रवाशांना दोष देत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी कोणीही अशाप्रकारे कचरा फेकणं अयोग्यच आहे. मग ते प्रवासी असोत वा कर्मचारी.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 14:35 IST
ताज्या बातम्या