स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थ साठवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. पण जर घरात फ्रिज नसेल तर? आजकाल प्रत्येक घरात फ्रिज असतोच त्यामुळे असा प्रश्न सहसा कोणाला पडणार नाही. पण पुर्वीच्या काळी जेव्हा फ्रिज नव्हते, तेव्हा खाद्यपदार्थ कसे साठवले जायचे हे कुतूहल मात्र सर्वांना असते. याचे उत्तर म्हणजे पुर्वीच्या काळात असे अन्नपदार्थ साठवण्यासाठी वेगवेगळे जुगाड केले जायचे. कल्पनाशक्ती वापरून खाद्यपदार्थ खराब होण्यापासून कसे वाचवता येतील यासाठी वेगवेगळे उपाय केले जायचे. असाच एक उपाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयएएस अधिकारी परवीन कासवान यांनी खेडेगावात दूध कसे साठवले जाते याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. जुन्या काळात जेव्हा फ्रिज नव्हते तेव्हा असा जुगाड करून खाद्यपदार्थ साठवले जायचे. परवीन कासवान यांनी शेअर केलेले हे फोटो त्यांच्या घरातीलच आहेत. ‘माझ्या घरातील या चुल्हीची संकल्पना सोपी आहे. सकाळी दूधाने भरलेली पातेली (२०-२५ किलोची) या चुल्हीवर ठेवली जातात. नंतर ते पुर्ण दिवस कमी आचेवर शिजवले जाते. अशी सिस्टिम तुम्ही कुठे पाहिली आहे का?’ असे कॅप्शन त्यातील एका फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : “भटक्या कुत्र्यांना जीव…”; अभिनेता सोनू सूदचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दुसऱ्या फोटोमध्ये परवीन कासवान यांनी दूध कसे साठवले जाते त्याची पद्धत दाखवली आहे. या फोटोमध्ये बांबूचा पिंजरा दिसत आहे त्याच्या आत दूधाचे भांडे ठेवले आहे. ‘ही घरगुती पद्धत सोप्पी आहे. वीज नसली तरी दूध नासू नये यासाठी या पिंजऱ्यात ते उघड्यावर ठेवले जाते. ही पद्धत आता कोणी वापरत नाही. पण आई अजुनही ही पद्धत वापरते.’ असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. यावर अनेक जणांनी कमेंट करत या पद्धतीचे कौतुक केले आहे. पाहूया नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा : चिमुकल्याने या पुतळ्याला मिठी मारली अन्…; निरागसता म्हणजे काय दाखवणारा Viral Video एकदा पाहाच

या भन्नाट जुगाडाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias officer shares how village households store milk in the absence of refrigerator see what how people reacted pns
First published on: 05-10-2022 at 16:54 IST