Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा | IAS Officer Shares Video of elephants searching ragi plants one of the calf tries to run watch what happens next in this viral video | Loksatta

Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं पाहा

Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा
हत्तीच्या कळपाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हायरल झालेले व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यातील प्राण्यांच्या गोंडस कृती पाहून चेहऱ्यावर हसू येते. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीचा कळप जंगलातून बाहेर जात असल्याचे दिसत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये हत्तींचा कळप जंगलातून बाहेर जात असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. तमिळनाडूमधील पुर्व घाटातील पर्वत रांगांमध्ये रागी पिकांच्या शोधात असे हत्तीचे कळप दरवर्षी जंगलाबाहेर पडतात. हे हत्ती सुखरूप जंगलात परतावे यासाठी वनअधिकारी सतत कार्यरत असतात, तसेच गावाकरीही यामध्ये मोलाचे योगदान देतात. अशी माहिती सुप्रिया साहू यांनी दिली. या व्हिडीओमध्ये हत्तीचे पिल्लू धावण्याचा प्रयत्न करत असताना काय घडते पाहा.

आणखी वाचा: अशी फोडणी तुम्ही कधीच पाहिली नसेल; संपूर्ण टोपानेच पेट घेतला अन्…; पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: Video: रस्त्यावर खड्डा दिसताच या लहान मुलांनी काय केले एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये माणसांप्रमाणे प्राणीही आपल्या मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी शिस्त मोडली तर त्यांच्यावर रागावतात, हे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 15:32 IST
Next Story
Video: तर मी प्रायव्हेट पार्ट कापून.. उर्फी जावेद भडकली; असं काही बोलून गेली की आता..