Viral Video: प्रत्येकाने सकाळी उठल्यावर आरोग्यदायी गोष्टी करणे गरजेचे असते. यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहत आणि दिवसाची सुद्धा चांगली सुरुवात होते. यासाठी आपल्याला अनेक जण सकाळी उठल्यावर चालायला जाण्यास सांगतात. तुम्ही आता पर्यंत माणसांना मॉर्निंग वॉकला जाताना पाहिलं असेल. पण, तुम्ही कधी हत्तीच्या पिल्लांना मॉर्निंग वॉकला जाताना पाहिलं आहे का? नाही… तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल हात आहे. यामध्ये तीन अनाथ हत्तीच्या पिल्लांची काळजी घेण्यासाठी त्यांना मॉर्निंग वॉकला घेऊन जाताना दिसले आहे.

व्हायरल व्हिडीओ तामिळनाडूमधील आहे; जो आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे. तामिळनाडूच्या थेप्पाकडू हत्ती छावणीत तीन हत्तीची पिल्ले मॉर्निंग वॉकला निघाले आहेत. पशुवैद्यक आणि वनपाल, हातात काठी घेऊन हिरव्यागार गवतात हत्तीच्या पिल्लांबरोबर चालायला निघाले आहेत. वनपाल पाठीमागे हात ठेवून एक-एक पाऊल टाकत आहेत. तर हत्तीची तिन्ही पिल्लं त्यांचे अनुसरण करताना दिसत आहेत आणि त्यांच्या मागून हळूहळू चालताना दिसत आहेत. मॉर्निग वॉक करणाऱ्या हत्तीच्या पिल्लांचा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…मुंबईकरांसाठी आनंद महिंद्रांनी सुचवला जुगाड; पावसाळ्यात छत्री पकडण्याचं टेन्शन दूर; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘कारसारखी टिकाऊ…’

व्हिडीओ नक्की बघा…

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी व्हिडीओ शेअर करीत लिहिले की, ‘तामिळनाडूमधील थेप्पाकडू हत्ती छावणीमध्ये हत्तीचे पिल्लू त्यांच्या प्रेमळ माहूतांसह मॉर्निंग वॉक करताना दिसले. थेप्पाकडू हत्ती छावणी नुकतंच अनाथ तीन बछड्यांची काळजी घेत आहे. हत्तीचे चार ते पाच महिन्याचे बाळ खूपच लहान असते. तसेच आईच्या दुधाची प्रतिकारशक्ती त्यांना न मिळाल्यामुळे ते खूप असुरक्षित असतात. पण, थेप्पाकडू हत्ती छावणीत वनपाल, स्वतःच्या मुलांप्रमाणे या तिन्ही हत्तीच्या पिल्लांची काळजी घेत आहेत. तामिळनाडू सरकारने स्थापन केलेली तीन सदस्यांची तज्ज्ञ समिती, स्थानिक टीम आणि पशुवैद्यक हत्तींच्या संरक्षणासाठी मार्गदर्शन करत आहे’ ; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांच्या अधिकृत @supriyasahuias या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या हत्ती पिल्लांना पाहून विविध शब्दात त्यांचे वर्णन करताना दिसत आहेत. तसेच या तिन्ही हत्तीच्या पिल्लांचे संरक्षण आणि काळजी घेणाऱ्या वनपालांचे आणि आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच हत्तीच्या पिल्लांचा मॉर्निंग वॉक करणाऱ्या या व्हिडीओने अनेकांचे मन जिंकले आहे.