उन्हाळ्याच्या सुट्ट्या लवकर सुरू होणार आहेत, ज्यामुळे अनेक पालकांचे टेन्शन वाढलेय; कारण आता मुलं दिवसभर घरातच बसून खूप खोडसाळपणा करतील. दंगा, मस्ती करून मुलं घर डोक्यावर घेतील. शाळेच्या नियमित दिवसांपासून, अभ्यासापासून विश्रांती मिळणार असल्याने मुलंही दिवसभर घरात गोंधळ घातलाना दिसतील. या सुट्टयांच्या दिवसांत विशेषत: नोकरी करणाऱ्या मातांसाठी ऑफिस आणि मुलांना एकाचवेळी सांभाळणे अधिक कठीण होत आहे. अशावेळी मुलांना सांभाळून काम कसे करायचे असा प्रश्न अनेक पालकांसमोर उभा राहतो. असाच काहीसा अनुभव पामेला सत्पथी नावाच्या महिला आयएएस अधिकाऱ्याला येत आहे.

महिला अधिकारी @PamelaSatpathy यांनी त्यांच्या लहान मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांचा मुलगा अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘पुष्प राज झुकेगा नही’ हा डायलॉग पूर्ण स्टाईलमध्ये बोलताना दिसत आहे. स्पायडर मॅनचे टिशर्ट घातलेला हा चिमुकला टेबलावर उकडून तिकडे उड्या मारत आपल्या बोबड्या आवाजात “पुष्प राज मैं झुकेगा नही” असे म्हणताना दिसतोय. यावेळी त्याची आयएएस अधिकारी आई टेबलवर फाईलमध्ये काहीतरी काम करतेय, पण चिमुकला मात्र मोठ-मोठ्याने ओरडत खेळताना दिसतोय.

उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद निरागस मुलाच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. पण, आई मात्र गंभीरपणे ऑफिसचे काम करताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करताना पामेला यांनी लिहिले की, वर्षातील सर्वात प्रतीक्षित काळ आणि वर्षातील सर्वात भयानक काळ, उन्हाळी सुट्ट्या. विशेषतः जेव्हा तुम्ही एका मुलाची आई असता. पण आयएएस अधिकारी पामेला यांच्याप्रमाणे आता अनेक पालकांना असाच अनुभव येत आहे. जो त्यांनी कमेंटसमध्ये सांगितला आहे. तर अनेक युजर्सनी कमेंटमध्ये पुष्पा सिनेमातील “पुष्पा, पुष्पराज झुके नही” हा डायलॉग लिहिली आहे.