Premium

“पाकिस्तानच्या खांद्यावर भगवा..”, भारतात आलेल्या बाबर आझम, शाहीनचे फोटो बघून ‘मीमर्स’ झाले लोटपोट

ICC World Cup 2023: सलमान आगा आणि मोहम्मद नवाज वगळता उर्वरित संघ आयुष्यात पहिल्यांदाच भारताला भेट देत आहे.

ICC World Cup Pakistan Team Saffron Bhagava on Babar Azam Shaheen Afridi Haris Rauf Check Out Funniest Memes Trending
बाबर आझमच्या खांद्यावर भगवा पाहून इंटरनेटवर मीम्सचे षटकार (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ट्विटर)

ICC World Cup Pakistan Team Saffron: ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी ICC विश्वचषक 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट संघ ७ वर्षानंतर भारतात दाखल झाला आहे. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली ३३ सदस्यीय तुकडी बुधवारी रात्री हैदराबादला पोहोचली. बाबर, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद रिजवान अशा स्टार क्रिकेटर्सना पाहण्यासाठी विमानतळावर शेकडो क्रिकेटचे चाहते उपस्थित होते. सलमान आगा आणि मोहम्मद नवाज वगळता उर्वरित संघ आयुष्यात पहिल्यांदाच भारताला भेट देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टीम हॉटेलपर्यंत सुरक्षा अधिकार्‍यांनी या पथकाचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, जिथे कर्मचाऱ्यांनी त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. स्वागताच्या दरम्यान हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी खेळाडूंना वेगवेगळ्या नक्षीदार शाली बहाल केल्या. यावेळी बाबर व अन्य काही खेळाडूंना भगव्या रंगांच्या शाली देण्यात आल्या होत्या. हे दृश्य पाहून नेटकरी मात्र खूपच खुश झाले आहेत.

भगवा रंग आणि हिंदुत्व हे नातं मागील काही वर्षात प्रचंड चर्चेत आहे. भगवा रंग केवळ भारतीय ध्वजातच नाही तर सत्ताधारी भाजप आणि इतर हिंदूत्ववाडी पक्षांच्या ध्वजात सुद्धा आहे. यामुळेच नेटकऱ्यांनी पाकिस्तानी संघावर खुलून दिसणारा भगवा रंग पाहून मीम्स पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

बाबर आझमच्या खांद्यावर भगवा पाहून इंटरनेटवर मीम्सचे षटकार

दरम्यान, २०१६ मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानने शेवटचा भारत दौरा केला होता. पाकिस्तानने आधीच उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सराव सुरू केला आहे जिथे ते न्यूझीलंड (२९ सप्टेंबर) आणि ऑस्ट्रेलिया (३ ऑक्टोबर) विरुद्ध दोन सराव सामने खेळतील. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ब्लॉकबस्टर लढतीसाठी अहमदाबादला जाण्यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी त्याच ठिकाणी ते श्रीलंकेशी भिडतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc world cup pakistan team saffron bhagava on babar azam shaheen afridi haris rauf check out funniest memes trending svs

First published on: 30-09-2023 at 15:04 IST
Next Story
“पोरी कुठली गं तू?” खानदेशी आजीच्या फॉरेनच्या सुनेबरोबर मराठीत गप्पा, VIDEO पाहून म्हणाल वाहह क्या बात…