Viral Video : पती पत्नीचे नाते हे सर्वात पवित्र नाते मानले जाते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. एकमेकांच्या सहवासाने हे नाते आणखी फुलते. नात्याचा गोडवा जपत हे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यातचं त्यांचे खरे प्रेम दडलेले असते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला या नवऱ्याचं बायकोवर किती प्रेम आहे, हे दिसून येईल. फक्त हाताला स्पर्श करुन डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना देखील भर गर्दीत नवरा बायकोला ओळखतो. हा व्हिडीओ पाहून अनेक जण म्हणतील, “याला म्हणतात खरं प्रेम” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि त्याच्या बायकोला ओळखायचं आहे. त्याच्या समोरुन एक एक व्यक्ती जाते. प्रत्येक व्यक्तीच्या हाताला तो स्पर्श करतो पण स्पर्श करताच त्याला कळते की ही त्याची बायको नाही. शेवटी एक तरुणी येते. जेव्हा तो तिच्या हाताला स्पर्श करतो तेव्हा त्याला लगेच कळते की हीच त्याची बायको आहे आणि डोळ्यावरची पट्टी न काढताच तिला घट्ट मिठी मारतो. हे पाहून तिथे जमलेले कुटूंबातील लोक जोर जोराने टाळ्या वाजवताना दिसतात.हा व्हिडीओ पाहून काही महिलांना वाटेल की नवरा असावा तर असा. ज्या प्रकारे तो आपल्याला पत्नीला ओळखतो, ते पाहून कोणीही थक्क होईल.

man riding on bull viral video
बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच
Orangutang visits the house viral video
Video : ओरँगउटांगने घरात शिरून आधी हात धुतले, नंतर… माकडाच्या ‘या’ करमातींनी व्हाल चकित

हेही वाचा : धक्कादायक! भरधाव कारने पायी चालणाऱ्या कुटुंबाला उडवले; थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

preehu_prem या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “किती प्रेमळ जोडी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “यालाच खरं प्रेम म्हणतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “असा नवरा प्रत्येकाला भेटायला पाहिजे” एका युजरने लिहिलेय, “त्याची बायको खूप नशीबवान आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.