Emotional video: वडिलांशिवाय जगाची कल्पनाही करू शकत नाही. वडील असतील तर मुलांची सर्व स्वप्ने पूर्ण होतात. असे म्हणतात की, बाप सर्व कष्ट घेऊन आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करतो. ज्यांना बाप नाही त्यांना किती वाईट वाटत असेल विचार करा. सोशल मीडियावर एक अतिशय भावूक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक नववधू आपल्या वडिलांचा फोटो घेऊन हळदीच्या मांडवात नाचताना दिसत आहे. वडीलांच्या आठवणीनं भावूक झालेल्या नवरीचा हा व्हिडिओ काळजाला भिडणारा आहे.

वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं. मुलं आईच्या खूप जवळची असतात, तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात, असं म्हटलं जातं. मुली वडिलांच्या खूप लाडक्या असतात. खरंच त्या ‘पापा की परी’ असतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण मुलगी वडिलांसाठी नक्कीच तेवढी खास असते.

भर मांडवात वडिलांचा फोटो हातात घेऊन लेक भावूक

व्हायरल व्हिडिओमध्ये एक नववधू आपल्या वडिलांची आठवण काढून कशी रडत आहे हे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांना रडवतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरीची हळद आहे आणि यावेळी नवरीला तिच्या दिवंगत वडिलांची आठवण आलीये. यावेळी ती वडिलांचा फोटो घेऊन मांडवात नाचताना दिसत आहे. यावेळी नवरीला अश्रू अनावर झाले. शिवाय हा क्षण अनुभवणारा प्रत्येकजण भावूक झाला होता. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक भावूक होत आहेत. लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्यावर कमेंट करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नव्या कोऱ्या बाईकला आग; तरुण गाडी बाजूला करायला गेला अन् २ सेकंदात झाला स्फोट, थरारक VIDEO व्हायरल

लेक माहेराच सोनं, लेक सौख्याच औक्षण, लेक बासरीची धूण, लेक अंगणी पैंजण…मुलींना परकं धन समजलं जातं, कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण आईवडीलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं.

हा व्हिडिओ pritamsalgaonkar नावाच्या इंस्टाग्राम यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला १ लाखांहून अधिक लोकांचे लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले – वडिलांशिवाय जग शून्य आहे. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने कमेंट करताना लिहिले आहे – तुम्ही धैर्यवान आहात. देव तुम्हाला सर्व सुख देवो.