सिद्धू मूसेवाला याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा तो काय करत होता? या प्रश्नाचे उत्तर मूसेवालाच्या प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायचे आहे. आता या प्रश्नाचा खुलासा मुसेवालाच्या गाडीत उपस्थित असलेल्या त्यांच्या मित्राने केला आहे. सिद्धू मुसेवाला याच्यावर जेव्हा गोळीबार झाला तेव्हा गुरविंदर सिंग त्याच थारमध्ये उपस्थित होते. त्याने सांगितले की, हल्ल्यापूर्वी सिद्धूने ‘उठेगा जवानी विच जनाजा मिठिए’ हे गाणे वाजवले होते.

या हल्ल्यात गुरविंदरही जखमी झाला. गुरविंदर सध्या लुधियानाच्या डीसीएम रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुरविंदर हा या प्रकरणातील महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, हल्ल्याच्या वेळी सिद्धूसह एकूण तीन लोक थारमध्ये उपस्थित होते.

एका वृत्तानुसार, गुरविंदर सांगतात की, त्यांनी सिद्धू मुसेवाला यांना बुलेटप्रूफ कारमध्ये बसवण्यास सांगितले होते. पण सिद्धूने ते मान्य केले नाही. त्याने म्हटले की ते थारमधूनच जातील. गुरविंदर सांगतो की हल्ला होण्याआधी सिद्धूने गाडीमध्ये ‘उठेगा जवानी विच जनाजा मिठिए’ हे गाणे वाजवले होते. ‘उठेगा जवानी विचार मिठिये’ हे गाणे सिद्धू मुसेवालानेच गायले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ‘द लास्ट राइड’ या नावाने ते प्रदर्शित करण्यात आले होते.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

रविवारी, २९ मे २०२२ रोजी सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात ही हत्या झाली. मुसेवाला त्याच्या थार कारमधून जात होता. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. असे सांगितले जात आहे की मुसेवाला याच्या शरीरातून २४ गोळ्या गेल्या. तर मुसेवाला यांच्या डोक्याच्या हाडात एक गोळी अडकल्याचे आढळून आले. बिश्नोई गँग आणि गोल्डी ब्रार टोळीने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गोल्डीने फेसबुक पोस्ट लिहून हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे.

‘मुंबईकर + सुरक्षा = आनंदी जीवन!’; मुंबई पोलिसांचा हटके रील तुम्ही पाहिला का?

दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना केली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, हा आयोग पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करेल.