scorecardresearch

चिडलेल्या हत्तीने गाडी पलटण्याचा प्रयत्न केला अन्…; जंगल सफारीला जाण्यापुर्वी हा Video एकदा पाहाच

IFS Officer सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं पाहा

चिडलेल्या हत्तीने गाडी पलटण्याचा प्रयत्न केला अन्…; जंगल सफारीला जाण्यापुर्वी हा Video एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मिडीया)

प्राणीप्रेमी जंगल सफारीसाठी एका पायावर तयार असतात. सुट्टी असेल तेव्हा किंवा रुटीनमधून वेळ काढून अनेकांना तुम्ही जंगल सफारीचा आनंद लुटताना पाहिले असेल. याचे बरेच व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ आपल्याला जंगल सफारी करण्यासाठी प्रोत्साहित करणारे असतात, तर काही व्हिडीओ वन्य प्राण्यांचे थक्क करणारे रूप दाखवतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती माणसांनी भरलेली गाडी पलटण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयएसएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक चिडलेल्या हत्तीने गाडी अडवल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर गाडीला डोक्याने धक्का देत, ती पलटण्याचा प्रयत्न करतो. यावर गाडीत बसलेली माणसं घाबरून खाली उतरू लागतात. त्यानंतर हत्ती दुसऱ्या बाजूने पुढे जाऊन खिडकीमधून सोंड आत नेऊन काही शोधत असल्याचे दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: चिमुकल्याने चक्क माकडांना केले खेळात सहभागी; हा खेळ पाहून नेटकरीही झाले अवाक, पाहा Viral Video

सुशांत नंदा यांनी शेअर केलेला व्हिडीओ:

आणखी वाचा: वाघाचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अन्…; थरकाप उडवणारा Viral Video एकदा पाहाच

व्हिडीओ शेअर करत सुशांत नंदा यांनी जंगल सफारी करणाऱ्या किंवा जंगलाच्या जवळून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ‘वन्य प्राण्यांना खायला देऊ नका, नाहीतर ते तुम्हाला त्यांचे खाद्य बनवतील. हा हत्ती देखील तेच करत आहे (खाऊ शोधत आहे). वन्य प्राण्यांना खायला देऊ नका’ असे कॅप्शन सुशांत नंदा यांनी दिले आहे. जंगल सफारी दरम्याम किंवा कोणत्याही इतर वेळी वन्य प्राण्यांना त्रास होईल अशा किंवा त्यांना सवयीच्या नसलेल्या गोष्टी प्रत्येकाने टाळायला हव्या. नाहीतर अशा चुकीच्या गोष्टी जीवावरही बेतू शकतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 20:11 IST

संबंधित बातम्या