जगातील सर्वात उंच स्त्रीचा शोध लागला आहे. हा विक्रम तुर्कीमध्ये राहणाऱ्या रुमेयसा गेलगीच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. रुमेसाची एकूण उंची ७ फूट ०.७ इंच (२१५.१६ सेमी) आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी रुमेसा गेलगी यांची उंची मोजल्यानंतर सर्वात उंच जिवंत महिला म्हणून तिचे नाव जाहीर केले. जगातील सर्वात लांब माणसाचा विक्रम तुर्कीच्या सुलतान कोसेनच्या नावावरही आहे. २०१८ मध्ये त्याची उंची ८ फूट २.८ इंच (२५१ सेमी) मोजली गेली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१४ मध्येही केला होता विश्वविक्रम

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्याबद्दल आनंद व्यक्त करताना रुमेयसा गेल्गी म्हणाल्या की, प्रत्येक नुकसानाला चांगल्या गोष्टीत बदलले जाऊ शकते, म्हणून तुम्ही कोण आहात हे स्वतः स्वीकारा. विशेष गोष्ट म्हणजे २०१४ मध्ये गेल्गीने सर्वात जास्त उंच किशोरवयीन मुलीचा विक्रमही केला होता. आता २०२१ मध्ये तिच्या नावावर सर्वात उंच असण्याचा विक्रमही झाला आहे.

(हे ही वाचा: Viral: सिडनीच्या रस्त्यावर धावतेय भारताची काळी-पिवळी टॅक्सी; नाव आहे बॉलिवूड कार)

वीव्हर सिंड्रोम पासून ग्रस्त

अहवालात असे सांगण्यात आले आहे की रुमेसा गेलगी वीव्हर सिंड्रोममुळे सामान्य जीवन जगू शकत नाही. त्यांना चालण्यासाठी व्हीलचेअर किंवा वॉकिंग फ्रेम वापरावी लागते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य संपादक क्रेग ग्लेन्डे म्हणाले की, रुमेसाचे रेकॉर्ड बुकमध्ये परत स्वागत करणे हा सन्मान आहे. त्यांची अदम्य भावना आणि धैर्य सर्वांसाठी प्रेरणा आहे.

( हे ही वाचा: म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी रस्त्यावर सादर केलं गाणं; हृतिक रोशननेही केलं कौतुक)

सुलतानच्या घरात प्रत्येकाची उंची आहे सामान्य

जगातील सर्वात उंच माणूस सुल्तान कोसेन हा देखील तुर्कीचा रहिवासी आहे. २०१८ मध्ये त्याची उंची ८ फूट इंच (२५१ सेमी) होती. सुलतानच्या मते, वयाच्या १० व्या वर्षी त्याची उंची अचानक वाढू लागली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याचे आईवडील आणि भावंडांसह त्याच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्य सरासरी उंचीचे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illness increased height and became the tallest woman in the world guinness world records ttg
First published on: 14-10-2021 at 14:21 IST