सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक मनोरंजक तर कधी अंगावर शहारा आणणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी लोकांनी बाईकवरुन केलेल्या स्टंटचेही व्हिडीओ असतात. सध्या अशाच एका बाईकस्वाराच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- चक्क मगरीशी भिडला कुत्रा, जबडा तोंडात दाबला अन् मगरीला फरफटत नेलं, Video पाहून थक्क व्हाल

Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
viral video of youtuber enjoying street massage
Video : अमेरिकन यूट्युबरला पडली भारतीय ‘मसाज’ची भुरळ! “याला कामावर घ्या…” चक्क इलॉन मस्ककडे केली मागणी
cab driver behind the cab wrote quotes on that the boys become emotional after reading it watch viral video
कॅब ड्रायव्हरने गाडीवर लिहिले असं काही की PHOTO पाहून युजर्स म्हणाले, “मुलांच्या वेदना कोणी…”

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती त्याच्या बाईकसह उंच डोंगरावर चढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला कोणीतरी असा धोकादायक स्टंट करू शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे. कारण, एखाद्या चढाला बाईक चालवाना तिचा समतोल साधता येत नाही आणि हा व्यक्ती थेट डोंगराव बाईक कशी चढवू शकतो? असा प्रश्न मनात उपस्थित होत आहे.

हेही पाहा- दोन्ही पायांनी अपंग पण ‘या’ चिमुरड्याची क्रिकेट खेळायची जिद्द पाहिलीत का? Video होतोय व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती बाइकवरून न थांबता थेट डोंगरावर जाताना दिसतं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक थक्क झाले आहेत. कारण एवढ्या मोठ्या डोंगरावर न थांबता बाइक चालवता येईल याची कल्पनाही करू शकत नाही असं काहीजण म्हणत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडिया @TheBest_Viral नावाच्या ट्विटर अकाऊटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘खूप भयानक स्टंट आहे.’ तर आणखी एका व्यक्तीने, खरच मला आश्चर्याचा धक्का बसल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी हे खरच खूप अद्वितीय आणि अप्रितिम असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत १ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ५ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.