scorecardresearch

Premium

Video : काय! ‘चीज’ घालून बनवले संत्र्याचे सरबत; ‘या’ Viral व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहा. . .

सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क संत्र्याच्या सरबतात चीज घालून पीत असल्याचे पाहायला मिळते. यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अगदीच बघण्यासारख्या आहेत.

Man drinks orange juice with slice of cheese
सिंगापूरमधील एक व्लॉगरने संत्र्याच्या सरबतात चीज घालून प्यायल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.[photo credit – लोकसत्ता ग्राफिक्स टीम]

बरेचदा आपण कुतूहल म्हणून दोन वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकत्र करून खातो. कधीतरी एखादा पदार्थ नकळत फारच सुंदर लागतो. तर कधी आपण हे असं काही खाण्याचा विचार तरी का केला असेल असा प्रश्न पडतो. सध्या सोशल मीडियावर असे बरेच व्हिडीओ आपल्याला दिसत असतात. त्यामध्ये आपल्याला कधी फळांचा चहा पाहायला मिळतो तर, कधी फॅन्टा मॅगी; तर कधी गुलाबजाम आईस्क्रीम डोसा असे पदार्थ पाहायला मिळतात. आता या वेळेस सिंगापूरमधील एका पाककला [culinary] व्लॉगरने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चक्क, संत्र्याच्या सरबतात चीज स्लाइस टाकून प्यायल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

वाचायला हा प्रकार जितका किळसवाणा वाटतो आहे, तितकाच तो चवीला देखील लागत आहे. कारण – सिंगापूरमधील कॅल्विन ली नावाच्या पाककला व्लॉगरने संत्र्याच्या चिजी सरबताची रेसिपी त्याच्या @foodmakescalhappy या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका रील व्हिडीओमधून शेअर केली असून; त्याला “संत्र्याचे चिजी सरबत, कुणाला हवे आहे का?” असे कॅप्शनदेखील दिले आहे.

How To Take A Deep Sleep with an eye mask To improve memory and concentration Important Sleeping Guide During 10th 12th Exams
झोपण्याआधी डोळ्यावर ‘ही’ वस्तू लावल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते? परीक्षांच्या काळात तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती
Surrogacy Rules Changed Marathi News
Surrogacy Rules : सरोगसीच्या कायद्यात केंद्र सरकारकडून बदल; डोनर गेमेट वापरण्याची मुभा, आई बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांना काय फायदा?
OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
loksatta analysis allegation of tribal reservation hit due to amendment in bindu namavali rule
विश्लेषण: आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागल्याचा आरोप का होतोय?

या व्हिडीओमध्ये, कॅल्विन एका ग्लासमध्ये संत्र्याचे सरबत ओतून त्यामध्ये, चीज स्लाइस घालताना दिसत आहे. यानंतर त्याने चीज घातलेल्या सरबताचा ग्लास मायक्रोवेव्हमध्ये चीज वितळेपर्यंत ठेवला आहे. त्यानंतर ग्लास बाहेर काढून ग्लासातील चीज आणि सरबत व्यवस्थित ढवळून घेऊन त्याचा एक घोट घेतो. ते संत्र्याचे चिजी सरबत प्यायल्यानांतर कॅल्विनने “या सरबताची चव काहीशी आंबट, गोड आणि दुधाळ लागत आहे. पण हे सरबत पिण्यासाठी अतिशय भयंकर लागत असून, कृपया कोणीही हे सरबत कुतूहल म्हणून पिण्याचा प्रयत्न करू नका.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही पहा : Video : प्रेयसीला चक्क पोलिसांसमोर घातली लग्नाची मागणी!! तरुणाचे हे ‘फिल्मी’ प्रपोजल होत आहे Viral; व्हिडीओ पाहा

या व्हिडीओला चार लाख सत्तर हजार व्ह्यूज मिळाले असून, नेटकऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहू.

या व्हायरल व्हिडीओवर एकाने, “अरे देवा हे काय आहे!! बघूनच पोटात कसेतरी होऊ लागले आहे.” असे म्हंटले. तर दुसऱ्याने, “मी हे पाहता क्षणीच ओळखले होते कि हे सरबत पाण्यासारखे अजिबात नाहीये.” तर तिसऱ्याने “आरोग्य मंत्रालय भीतीने या व्यक्तीपासून दूर राहतात.” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. तर शेवटी काही नेटकऱ्यांनी त्याला अजूनकाही विचित्र पदार्थ खाऊन बघण्यास सांगितले, “पुढच्या वेळेस, चीज स्लाइसऐवजी क्रीम चीजचा वापर करून पहा. कदाचित ते संत्र्याच्या चीजकेक सारखे लागेल.” “कोकमध्ये दूध मिसळून ते तीस मिनिटांसाठी बाजूला ठेवा आणि नंतर पिऊन पाहा.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In a viral video man tries bizarre combination of cheese and orange juice together this is how he reacts dha

First published on: 27-11-2023 at 18:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×