अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील मॉन्टगोमेरी येथे एका विमान अपघाताची घटना घडली आहे. हवेतून उडणारे एक विमान थेट विजेच्या तारांमध्ये अडकल्यामुळे जवळपास ९० हजारांहून अधिक लोकांच्या घरातील वीज गेली आहे. विमान अपघातीची ही घटना रविवारी सायंकाळी मॉन्टगोमेरी येथील काउंटी पॉवर लाईन्समध्ये घडल्याची माहिती वॉशिंग्टन पोस्टच्या एका अधिकाऱ्यांने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, मॉन्टगोमेरी येथे एक छोटे विमान हवेतून जात असताना अचानक ते वीजेचा तारांमध्ये घुसल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये. तर फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशनने (FAA ) सांगितलं की, रविवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास एनवाई येथून उड्डाण घेतलेले एक सिंगल-इंजिन विमान गैथर्सबर्गमधील मॉन्टगोमेरी काउंटी एअरपार्कच्या जवळ असणाऱ्या वीजेच्या तारांमध्ये अडकले. तर त्या विमानाची ओळखदेखील FAA कडून करण्यात आली असून ते विमान ‘मूनी M20J’ असल्याचं सांगितलं जातं आहे.

या घटनेबाबत मॉन्टगोमेरी काउंटी पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “रॉथबरी डॉ अँड गोशेन आरडी परिसरात एक लहान विमान वीजेच्या तारांमध्ये घुसल्याने त्या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अग्निशामक दलासह बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. तर नागरिकांनी या भागात जाणं टाळावं” असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

विमानातील तिघेही सुखरुप –

हेही पाहा- अरे बापरे! क्रूझमधून समुद्रात पडला प्रवासी; अन् पुढे घडलं असं काही…व्हिडीओ व्हायरल

मॉन्टगोमेरी काउंटी अग्नीशामक दल आणि बचाव पथकाचे मुख्य प्रवक्ते पीट पिरिंगर यांनी ट्विट करत विमानात असणारे तिन्ही लोकं सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे.

पाऊसामुळे घडला अपघात –

दरम्यान, विमानाचा अपघात घडलेल्या भागात पाऊस पडत होता. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलं आहे. तर या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचे विमान विजेच्या तारांमध्ये अडकल्याचं दिसतं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In america a air plane crashed directly into power lines leaving more than 90000 homes in the dark jap
First published on: 28-11-2022 at 11:04 IST