ऑगस्टमध्ये गुगलने भारतीय ९३,५५० Content काढून टाकला; जाणून घ्या काय आहे कारण

जुलैमध्ये गुगलने ग्राहकांकडून ३६,९३४ तक्रारी आल्याचे सांगितले.

Google-1
कंपनीने ९३,५५० कॉटेंट काढून टाकला. (फोटो: AP/File)

गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये गुगलने भारतातून मोठ्या प्रमाणात कॉटेंट काढून टाकला आहे. खरं तर, गुगलकडे अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर कंपनीने ९३,५५० कॉटेंट काढून टाकला. मासिक पारदर्शकता अहवालात, गूगलने म्हटले आहे की ऑगस्टमध्ये ग्राहकांकडून ३५,१९१ तक्रारी प्राप्त झाल्या.या तक्रारींच्या आधारे, कंपनीने म्हटले आहे की त्यांनी ऑगस्टमध्ये ग्राहकांकडून आलेल्या अहवालांच्या आधारे स्वयंचलित तपासणीच्या परिणामी सामग्री काढून टाकली.

गुगलने असेही म्हटले आहे की जेव्हा आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर कॉटेंटबद्दल तक्रारी प्राप्त होतात तेव्हा आम्ही त्यांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करतो. २६ मे रोजी लागू झालेल्या भारताच्या आयटी नियमांच्या अनुपालनाचा भाग म्हणून कंपनीने हे खुलासे केले आहेत. अहवालांनुसार, या नोंदणीकृत तक्रारी तृतीय पक्षांशी संबंधित आहेत जे स्थानिक कायदे किंवा वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन करतात असे मानले जाते.

३६,९३४ तक्रारी प्राप्त

जुलैमध्ये गुगलने ग्राहकांकडून ३६,९३४ तक्रारी आल्याचे सांगितले. यावर आधारित, त्यांनी ९५,६८० कॉटेंट काढले होते. याशिवाय, जुलैमध्ये स्वयंचलित ओळखीच्या आधारावर ५,७६,८९२ कॉटेंट काढून टाकले होते. गुगलने सांगितले की जेव्हा आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर कॉटेंटबद्दल तक्रारी प्राप्त होतात, तेव्हा आम्ही त्यांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करतो. अमेरिकेतील कंपनीने भारताच्या आयटी नियमांचे पालन करत ही माहिती सार्वजनिक केली आहे. गुगलने आपल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की हे साहित्य तृतीय पक्षांशी संबंधित आहेत. असे मानले जाते की ही सामग्री स्थानिक नियमांचे आणि इंटरनेट मीडिया मध्यस्थ प्लॅटफॉर्मचे उल्लंघन करते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In august google removed 93550 indian content know what the reason is ttg

फोटो गॅलरी