बिहारमधून दररोज नवनवीन भन्नाट आणि विचित्र घटना व्हायरल होत असतात. ज्या पाहून वाचून अनेकदा आपलं मनोरंजन होतं तर कधी आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. जी समजल्यावर तुम्हीदेखील आश्चर्यतकित व्हाल यात शंका नाही. हो कारण बिहारमधील एका सरकारी शाळेतील माजी विद्यार्थ्याने चक्क तो ज्या शाळेत शिकला त्याच शाळेची जमीन विकल्याचं उघडकीस आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्याने ही जमीन खरेदी केली आहे तो देखील याच शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर हे प्रकरण नेमकं काय ते जाणून घेऊया.
नेमकं काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील राजा पृथ्वीचंद उच्च माध्यमिक विद्यालयाची जमीन याच शाळेत शिकणाऱ्या एका माजी विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला विकली आहे. दोन्ही विद्यार्थी पूर्वी एकाच शाळेत शिकत होते. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, १०० वर्षांपूर्वी राजा पृथ्वी चंद पूर्णिया शहरात राहत होते. त्यांनी शाळेसाठी बिहार सरकारला आपली जमीन दान केली होती. परंतु बिहारच्या शिक्षण विभागाचा निष्काळजीपणामुळे शाळेसाठी दान दिलेली जमीनही त्यांनी आतापर्यंत शाळेच्या नावावर केलीच नव्हती. त्यामुळे जमिनीवर सरकारचा अधिकारच राहिला नव्हता. सांगण्यासाठी ती जागा फक्त शाळेची होती पण कागदोपत्री ती शाळेच्या नावावर झाली नव्हती.
दरम्यान, आता ज्या राजाचे ही जमीन दान केली होती. त्याचे वंशज पूर्णिया येथे आले यावेळी त्यांना त्यांची काही जमीन जिल्ह्यात असल्याचे समजले. याबाबत त्यांनी चौकशी केली असता शाळेच्या जमिनीची माहिती मिळाली. तर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या जागेचा मालकी हक्क अद्याप शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झालेले नव्हते. अशा परिस्थितीत वंशजांनी संधीचा फायदा घेत त्यांनी शाळेला दान केलेली जमीन स्वतःची समजून विकली. ज्याची आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bihar a student sold the land of his own school people are saluting him on social media news went viral jap