विविध गुन्ह्यात अटक केलेल्या कैद्यांनी चक्क पोलिसांच्या उपस्थित तुरुंगातच दारु-पार्टी केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दारु बंदी असलेल्या बिहारमध्येच ही घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. शिवाय या कैद्यांची पार्टी सुरु असताना, ड्युटीवर असलेल्या दोन पोलिस हवालदाराना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हेही पाहा- आळशीपणाचा कळस! Online Payment साठी सतत मोबाईल काढावा लागतो म्हणून पठ्ठ्याने हातावरच काढला बारकोड

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी केलेल्या कारवाईत पालीगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीतून पाच जणांना अटक करुन त्यांना तुरुंगात ठेवलं होतं. मात्र, अटक केलेल्या कैद्यांनी तुरुंगातच दारु पार्टी सुरु केली. कैदी दारु पित असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळताच पालीगंजचे ASP अवधेश दीक्षित यांनी तत्काळ पोलिसांच्या एका पथकाला दारु-पार्टी सुरु असलेल्या तुरुंगावर छापा टाकण्याचे आदेश दिले.

हेही पाहा- Viral Video: लग्नाला नकार दिला म्हणून मुलीचं अपहरण, मुलीच्या वडिलांनी आरोपीच्या कुटुंबीयांवर रोखली बंदूक अन्…

या पथकाने उत्पादन शुल्क विभागाच्या तुरुंगात छापा टाकला असता, तुरुंगातील पाच कैदी दारू पिताना पकडले. तर त्यांच्याकडून पाच लिटर दारूदेखील जप्त केली. शिवाय हे कैदी दारु पित असताना तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिस हवालदारांनी त्यांच्यावर काहीही कारवाई न करता, केवळ बघ्याची भूमिका घेतल्या प्रकरणी दोन हवालदारानांही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या तुरुंगामध्ये कैद्यांच्या दारू पार्टीचा व्हिडीओ अज्ञात व्यक्तीने पोलिसांना पाठवला होता, त्या आधारे पोलिसांनी हा छापा टाकल्याची माहिती ASP दीक्षित यांनी दिली. तसेच अटक करण्यात आलेल्या कैद्यांकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. कैद्यांनी बाहेरून दारू मागवून तुरुंगामध्ये पिल्याचा संशय पोलिसांना आहे. या सर्व पार्टी प्रकरणाची नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली.