Video of Uncle Burst Cracker on his head: हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. यावर्षी २८ तारखेपासून म्हणजे वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात झाली. दिवाळी म्हटलं की सगळीकडे रोषणाई, कंदील, फराळ, मिठाई, नवनवीन कपडे, भेटवस्तू, फटाके अशा सगळ्या गोष्टी आपसूकच डोळ्यांसमोर येतात.
काही जण दिवे लावून, तर काही जण फटाके फोडून हा सण साजरा करतात. दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. अशातच अनेक जण फटाके फोडताना स्टंट करतात आणि यामुळे अनेकदा अपघात होतो आणि लोकं जखमी होतात, तर काहींच्या जीवाला धोकादेखील निर्माण होतो. परंतु, तरीही मजा मस्ती म्हणून काही जण अशी स्टंटबाजी दरवर्षी करतच असतात आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतानादेखील आपण पाहतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका काकांनी चक्क डोक्यावर पाऊस लावला. या व्हिडीओत नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊ या.
व्हायरल व्हिडीओ
यावर्षीच्या दिवाळीची सुरुवात या काकांनी अगदी जोमात केलेली दिसतेय. या व्हायरल व्हिडीओमध्ये भररस्त्यात एक तरुण दिवाळीचा पाऊस लावताना दिसत आहे. या फटाक्याने पेट घेताच तिथे बाजूला असलेले काका तो पेटलेला पाऊस घेतात आणि चक्क त्यांच्या डोक्यावर ठेवतात. काकांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ @whatthe.duck__memes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “पॉवर ऑफ ओल्ड मॉन्क” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल ८८.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “यांच्या डोक्यात नक्कीच खड्डा पडला असणार”, तर दुसऱ्याने “पॉवर ऑफ दारू” अशी कमेंट केली. तर एकाने “काका ऑन फायर”अशी कमेंट केली. अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.