scorecardresearch

वरातीसाठी कायपण! खर्च करायला पैसे नाहीत म्हणून लग्नाआधीच नवरदेव थेट ATM फोडायला गेला अन्…

वरातीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून नवरदेव गॅस कटर घेऊन थेट ATM मध्ये शिरला

Groom ATM cutting
लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात करण्याची अनेकांना हौस असते. यासाठी ते कितीही पैसे खर्च करायला तयार असतात. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात करण्याची अनेकांना हौस असते. यासाठी ते कितीही पैसे खर्च करायला तयार असतात. कारण लग्नाचा क्षण आयुष्यातील सर्वात महत्वाचा असल्याचं माणलं जातं. शिवाय आजकाल वरातीमध्ये भरमसाठ पैसे खर्च करण्याची पद्धत पडली आहे. पण लग्नाच्या वरातीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्या नवऱ्या मुलाने चोरी केल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं नसेल.

पण सध्या उत्तर प्रदेशमधून अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये एका नवरदेवाने वरातीला पैसे नाहीत म्हणून त्याने असा काही कारनामा केला आहे, ज्यामुळे लग्नाआधीच तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील एक तरुणाच्या लग्नाची घरी धामधुम सुरु असतानाच त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ का आली हे ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

हेही वाचा- एका रात्रीत एक दोन नव्हे तब्बल ६ हजार २४३ कोटींचा बनला मालक, निमित्त ठरली ‘ही’ एक गोष्ट

कारण या तरुणाला आपल्या लग्नाच्या वरातीत उडवण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याने चक्क गॅस कटरने एटीएम कापण्याचा प्लॅन केला होता. मात्र, तो ATM गॅस कटरने कापत असतानाच पोलिसांच्या तावडीत सापडल्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागलं. अटक करण्यात आलेला व्यक्ती फिरोजाबाद येथील ऑर्किड अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतो. आकाश गुप्ता असं या तरुणाचं नाव आहे. तो सुहाग नगरमध्ये काचेचा व्यवसाय करतो. पण व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्यामुळे त्याच्याकडे पैशांची कमतरता होती.

हेही वाचा- “माझी काडीपेटी परत करा अन्यथा…” वीज विभागाच्या कार्यालयात डेंजर वाद; Viral पत्र पाहून पोट धरुन हसाल

अशातच त्याचं ७ फेब्रुवारीला लग्न होणार होते पण लग्नात खर्च करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी दुपारी ४ वाजता त्याच्या नातेवाईक वरात काढण्याच्या तयारीत असतानाच, त्याने जळेसर येथील एटीएम फोडण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार २ फेब्रुवारी रोजी ते गॅस कटर घेऊन एटीएममध्ये पोहोचला. पण त्याला सुरक्षा रक्षकाने पाहताच त्याने तेथून पळ काढला. पहिला प्रयत्न फसल्यावर त्याने पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांना तत्परतेने केली कारवाई –

ATM कोणीतरी फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सक्रियता वाढवली आणि आकाश पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमजवळ पोहोचताच ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी त्याला पाहताच ताब्यात घेतलं. शिवाय त्याच्याकडून गॅस कटरसह इतर अनेक साधनेही जप्त करण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 11:48 IST
ताज्या बातम्या