भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे अंदाज व्यक्त केले जात असतानाच आता एका नावाजलेल्या वृत्तसंस्थेच्या नावाने काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. इन्स्टाग्रामवर धनश्रीने नावात केलेला बदल आणि युजवेंद्रने डिलीट केलेल्या इन्स्टा स्टोरीनंतर दोघांमध्ये वाजल्याची चर्चा असतानाच वृत्तसंस्थेच्या नावाने या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र आता या व्हायरल पोस्टसंदर्भात वृत्तसंस्थेनेच खुलासा केला आहे.

एएनआय म्हणजेच एशिया न्यूज इंटरनॅशनल या भारतातील आघाडीच्या वृत्तसंस्थेच्या नावाने ट्विटरवरील काही पोस्टचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्रीने पंजाबमधील न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केल्याची पोस्ट एएनआयच्या नावाने करण्यात आल्या आहेत. मात्र या व्हायरल स्क्रीनशॉर्टचे फोटो पोस्ट करत एएनआयच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ही खाती बनावट असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

mumbai high court evm purchase marathi news
“न्यायालय टपाल खाते आहे का ?”, मतदान यंत्र खरेदीसंदर्भातील याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्याला खडेबोल
Government failure to take action against misleading companies Supreme Court verdict on Patanjali case
दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत सरकार अपयशी; पतंजली प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशोरे
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द
High Court, Expresses Anger, maharashtra Government, Delay, Taking Possession, New High Court Building, Site in Bandra,
जागा हस्तांतरणाला होणाऱ्या विलंबावरून उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारची कानउघाडणी

७२ लाख २२ हजारांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या एएनआयने, “ही तिन्ही बनावट खाती असून त्यांनी एएनआय असल्याचा बनाव केला आहे. अशी कोणतीही बातमी देण्यात आलेली नाही,” असं स्क्रीनशॉर्ट पोस्ट करत म्हटलं आहे.

दरम्यान, दुसरीकडे चहल आणि धनश्रीच्या नात्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु झालेल्या असतानाच युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामला आणखी एक स्टोरी शेअर केली असून चर्चांवर भाष्य केलं आहे. चहलने पत्नीसोबत घटस्फोट झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं आवाहन केलं असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी विनंती केली आहे. “माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की, माझ्या नात्यासंबंधी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया त्याला पूर्णविराम द्या. सर्वांना प्रेम,” असं चहलने म्हटलं आहे.

चर्चा कशामुळे सुरु झाली?
धनश्रीने लग्नानंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये बदल करत चहल आडनाव जोडलं होते. मात्र अलीकडेच तिने चहल आडनाव काढून धनश्री वर्मा असा बदल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, धनश्रीने नावात बदल केल्यानंतर चहलनेसुद्धा आपल्या अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ‘नवीन आयुष्याची सुरूवात’ असं लिहिलेली स्टोरी चहलने काही वेळानंतर डिलीट केली. यामुळे चाहते बुचकळ्यात पडले असून दोघांनी घटस्फोट घेतल्याची चर्चा रंगली आहे.