Heart Attack in Kids : सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं झालं आहे. आरोग्याकडे थोडा जरी निष्काळजीपणा केला तर तो महागात पडू शकतो. आपण अनेकदा वृद्धांमध्ये, तरूणांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचं ऐकलं आहे. पण, लहान मुलांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आता दिसू लागला आहे. याचाच प्रत्यय आला आलाय. गुजरातमध्ये नुकतीच एक वेदनादायक घटना समोर आली आहे.आठ वर्षाच्या मुलीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मुलीच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. गुजरातच्या सुरत शहरातील एका शाळेत अभ्यास करीत असताना एका आठवीच्या विद्यार्थीनीला हार्टअटॅक आल्याने ती चक्कर येऊन पडली. नंतर शाळेच्या प्रशासनाने तिला नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतू तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या मुलीचे नाव रिद्धी असून या घटनेनंतर शाळेत सन्नाटा पसरला आहे. रिद्धीच्या मृत्यूनंतर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की शिक्षक वर्गात शिकवत आहेत आणि मुलगी समोरच्या बेंचवर बसली आहे. सुरुवातीला मुलगी व्यवस्थित बसलेली दिसते. मात्र अचानक ती जमिनीकडे वाकू लागते आणि खाली पडते. ही घटना वर्गात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणूनच जग यांना शिव्या घालतं”; पाकिस्तानात दोन नेते LIVE शोमध्ये भिडले; अक्षरश: लाथाबुक्क्यांनी तुडवलं

पालकांची अवस्था वाईट

रिद्धी बेशुद्ध पडताच वर्गातील विद्यार्थ्यांनी मदतीसाठी धावा केला. तेव्हा सर्व शिक्षकांनी त्या वर्गात धाव घेतली. सुरुवातीला शिक्षकांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतू काही उपयोग झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. मुलीच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वहात आहेत.

Story img Loader