Viral Video : इडली हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. एखादी विशिष्ट पिपाणी वाजवत सकाळी इडली विकणारा चाळीत आलेला एकदा तरी तुम्ही पाहिला असेल.आपल्यातील बरेचजण सुट्टीच्या दिवशी किंवा ऑफिसला जाण्याआधी इडली खाऊनच दिवसाची सुरुवात करतात. इडली चिली, रवा इडली, पोहा इडली आदी अनेक प्रकार तुम्ही इडलीचे खाल्ले असतील. पण, आज व्हायरल व्हिडीओत चक्क नारळाच्या करवंटीत इडली बनवण्यात आली आहे.
इडली सांबार किंवा इडली चटणी बऱ्याच लोकांना खायला आवडते. तर आज चक्क नारळाच्या करवंटीमध्ये इडली तयार करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओत एका मशीनच्या सहाय्याने नारळामधील खोबरे काढून घेतले आहे. त्यानंतर बऱ्याच नारळाच्या करवंट्या घेऊन, त्यामध्ये तयार करून घेतलेले इडलीचे पीठ प्रत्येक करवंट्यांमध्ये चमच्याने टाकलं आहे आणि मोठ्या ओव्हनमध्ये या सगळ्या नारळाच्या करवंट्या काही वेळासाठी ठेवून दिल्या आहेत. तसेच इडली तयार झाल्यानंतर त्यावर वरून तूप सोडण्यात आले आहे आणि अशा प्रकारे नारळाच्या करवंटीमध्ये इडली बनवण्यात आली आहे. नारळाच्या करवंटीमध्ये कशा प्रकारे इडली तयार करण्यात आली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
नारळाच्या करवंटीत बनवली इडली :
बंगळूरमध्ये नारळाच्या करवंटीमध्ये अशी खास इडली बनवण्यात येते.याआधीही बंगळूरुच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत; त्यात रिक्षात इन्स्टाग्राम आयडी लिहिणे असो किंवा हेलिकॉप्टरमुळे ट्रॅफिक जॅम झालेले असो या सर्वच गोष्टींच्या यादीत आता या अनोख्या इडलीचासुद्धा समावेश झाला आहे. इडलीसोबत गरमागरम सांबार आणि खोबऱ्याची चटणी कोणाला खायला आवडणार नाही? पण इथे तर नारळाच्या करवंटीमध्येच इडली तयार करण्यात आली आहे, जे बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सोशल मीडियावर नारळाच्या करवंटीमध्ये बनवलेली ही खास इडली @banglorefoodie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्या फूड ब्लॉगरचे नाव आर्यन गौतम असे आहे. तर अनेकजण हा व्हिडीओ पाहून, ‘नारळाच्या करवंटीमधून खा किंवा प्लेटमधून, इडलीची चव बदलणार नाही’. ‘सांबार ऐवजी इडलीवर तूप टाकण्यात आलं आहे इतकाच फरक आहे’, तर अनेकांना साधी इडलीच खायला आवडेल असे मत व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहे.