समजा, तुम्ही एखाद्या रेस्तराँमध्ये जाऊन जेवणासाठी मासे ऑर्डर केले आणि जेव्हा तुम्ही हे मासे खायला जाता तेव्हा तुम्हाला कळलं की हे मासे जिवंत आहे, तर तुम्ही काय कराल? नक्कीच तुम्ही घाबरून जाल. असाच एक हैराण करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा व्हिडीओ क्वचितच तुम्ही आधी कधी पाहिला असेल. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

भारतात जेव्हा लोक मांसाहारी जेवण ऑर्डर करतात, तेव्हा ते पूर्णपणे शिजलेले जेवणच ऑर्डर करतात. क्वचितच कोणी मासे शिजवल्याशिवाय खाईल. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका रेस्तराँने ग्राहकाला जिवंत मासे खायला दिले आहेत. खाण्यासाठी ग्राहकाने चॉपस्टिक पुढे करताच माशाने तोंड उघडले. हे पाहून ग्राहकही घाबरले.

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

…अन् काही सेकंदात इमारत झाली जमीनदोस्त; Viral Video पाहून काळजात धस्स होईल

Optical Illusion : ‘या’ एका चित्रात आहेत इतके प्राणी; शोधा आणि सांगा किती आहेत?

आपण पाहू शकतो की हा मासा आपल्या तीक्ष्ण दातांनी चॉपस्टिक्स घट्ट पकडतो. यानंतर तो मासा चॉपस्टिक्स स्वतःकडे ओढताना दिसत आहे. एकप्रकारे हा मासा, ग्राहकाला ती डिश खाण्यापासून मनाई करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच झपाट्याने व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही प्लेटमध्ये सॅलडसह काही मासे काही पाहू शकता.

सुरुवातीला पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की मासे चांगले शिजलेले आहेत. मात्र, खाणाऱ्याला त्यात काही गडबड वाटल्यामुळे तो माशाच्या तोंडाजवळ चॉपस्टिक्स घेऊन जातो. मासा अचानक तोंड उघडतो आणि चॉपस्टिक्स पकडतो. या दरम्यान ग्राहक चॉपस्टिक्स सोडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु, मासा चॉपस्टिक्स घट्ट पकडून ठेवतो. हा व्हिडीओ rhmsuwaidi नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून व्हिडीओ पाहून नेटकरी खूपच हैराण झाले आहेत.