In Uttar Pradesh lovers were brutally beaten and made to lick their spittle | Loksatta

प्रेम केलं एवढाच गुन्हा! प्रेमी युगुलास बेदम मारहाण करत थुंकी चाटायला लावली

गावचा प्रमुखाने दोघांना काठीने मारहाण करत थुंकी चाटायला लावली

प्रेम केलं एवढाच गुन्हा! प्रेमी युगुलास बेदम मारहाण करत थुंकी चाटायला लावली
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

उत्तर प्रदेशातून एक संतापजनक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशातून अनेक गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता गाझीपूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका तरुणाला आणि त्याच्या प्रेयसीला अत्यंत वाईट वागणूक दिल्याचं दिसतं आहे. एक व्यक्ती या दोघांनाही काठीने मारहाण करत त्यांना जमीनीवर थुंकायला लावतो आणि नंतर तीच थुंकी दोघांना चाटायला लावत असल्याचा किळसवाना प्रकार समोर आला आहे. या घटनेचे वृत्त डीएनए वृत्तवाहिनीने दिले आहे.

हेही वाचा- चक्क माशांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त, गावात कोणी पोरगी द्यायला धजेना त्यामुळे अविवाहित त्रस्त

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण बहारीयाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाला बुजुर्ग गावातील आहे. व्हिडिओमध्ये प्रेमी युगुलांस मारहाण करणारा व्यक्ती गावचा प्रमुख ब्रिजेश यादव असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय पीडित तरुण आणि तरुणी अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती गावच्या प्रमुखाला समजताच त्याने दोघांनाही आपल्या घरी बोलावलं आणि अतिशय वाईट आणि संतापजनक शिक्षा दिली आहे.

हेही वाचा- पुस्तक देण्याच्या बहाण्याने गेली ती परतलीच नाही, माहेरी आलेली तरुणी प्रियकरासोबत पळाली

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय गावाच्या प्रमुखावर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील लोकांकडून केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजली. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर गाझीपूर पोलिस स्टेशनचे पोलिस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी सांगितलं की, या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.

हेही वाचा- ऐकावं ते नवलच! पोलिसांनी मारला पोलिसांच्या गाडीवर डल्ला; डिझेलचा मोह अंगलट आला…

पळून गेल्याचा राग –

दरम्यान, या घटनेतील मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं होतं. लग्न ठरल्यानंतर तरुण आणि तरुणीने घरातून पळून जाऊन एका मंदिरात लग्न केलं होतं. या दोघांनी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरुन गावच्या प्रमुखाने या दोघांना घरी बोलावून बेदम मारहाण करत त्यांच्याशी वाईट वर्तन केलं. धक्कादायक बाब म्हणजे या प्रमुखाने या प्रेमी युगुलास गावकऱ्यांसमोर मारहाण केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 21:22 IST
Next Story
वेड्या बहिणीची वेडी माया! धाकट्या बहिणीला पाहून मोठ्या बहिणीनं काय केलं पाहा? Viral Video पाहून आनंदाश्रू तरळतील