उत्तराखंडमध्ये पावसाच्या तडाख्याने नदीच्यामध्येच अडकला हत्ती; वन विभागाने वाचवले प्राण

व्हिडीओमध्ये, हत्ती गौला नदीच्या मध्यभागी अडकलेला दिसतो. हत्तीच्या आजूबाजूला पाणी अखंडपणे वाहते आहे.

officers save elephant in rain
हा फोटो व्हायरल झाला आहे (फोटो: ANI/Twitter )

पूर आणि बचाव कार्याच्या अभूतपूर्व दृश्यांनी उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर उत्तराखंडमध्ये झालेल्या नुकसानीची नोंद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संवाद साधला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दहा पथके उत्तराखंडमध्ये काम करत आहेत आहेत. एनडीआरएफचे प्रमुख सत्य प्रधान यांनी आज सकाळी काही फोटो आणि व्हिडीओ ट्वीट केले ज्यात पावसाच्या तडाख्याने अडकलेल्या लोकांचा बचाव जवान करताना दिसत आहेत.

असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात असताना, जिम कॉर्बेट पार्कजवळ नैनीताल येथे महापूरात अडकलेल्या हत्तीची एक व्हिडीओ व्हायरल झाली आहे.व्हिडीओमध्ये, हत्ती गौला नदीच्या मध्यभागी अडकलेला दिसतो. हत्तीच्या आजूबाजूला पाणी अखंडपणे वाहते आहे.

( हे ही वाचा: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलनामध्ये अडकलेल्या कारला BRO ने वाचवले)

( हे ही वाचा: प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात झाली लॉंच; जाणून घ्या किंमत)

“आम्हाला माहिती मिळताच वन विभागाचे एक पथक रवाना झाले. हत्ती नदी ओलांडून देव रामपूरच्या दिशेने गेला होता. वन विभागाने त्याला जंगलाच्या दिशेने ढकलले आहे. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे,” संदीप कुमार, विभागीय वन अधिकारी, हल्दवानी यांनी वृत्तसंस्था एएनआयने सांगितले.

राज्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, आणि मुसळधार पावसामुळे किमान १२ जण बेपत्ता आहेत. मुसळधार पाऊस पडल्यानंतर उत्तराखंड हे एकमेव राज्य नाही. आठवड्याच्या शेवटी, केरळमध्ये भूस्खलन आणि अनेक भागांमध्ये पूर आल्यानंतर २०हून अधिक मृत्यू झाले. तामिळनाडूमध्येही पुराचा सामना करावा लागत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In uttarakhand an elephant got stuck in a river due to heavy rains the forest department saved lives ttg