scorecardresearch

Premium

Video : वाढदिवस साजरा करण्यासाठी सहलीला गेलेल्या कुटुंबाची अस्वलाबरोबर थरारक भेट…

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी सहलीला गेले होते आणि जेवत असताना एक जंगली अस्वल आले

In viral Video Family went on a picnic and were eating when a wild bear came
(सौजन्य:ट्विटर/@Voyagefeelings) Video : वाढदिवस साजरा करण्यासाठी सहलीला गेलेल्या कुटुंबाची अस्वलाबरोबर थरारक भेट…

जंगलातील प्राणी शहरी रस्त्यावर दिसण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. विविध प्रकल्पांसाठी झाडे तोडण्यात आल्यामुळे जंगलातील प्राणी आता रस्त्यावर दिसून येत आहेत. सिंह, बिबट्या, साप आदी वन्यप्राणी अन्न-पाण्याच्या शोधात शहरांमध्ये भटकताना दिसून आले आहेत. आज सोशल मीडियावर मेक्सिकोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी मेक्सिको सिटीहून चिपिंके पार्कला पोहोचलेल्या कुटुंबाचा अस्वलाशी सामना होतो आणि आई ही परिस्थिती अगदीच शांततेनं सांभाळून घेते.

दक्षिण अमेरिका देशातील मेक्सिकोमध्ये ही घटना घडली. सहलीला फिरायला आलेलं कुटुंब एका ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी थांबते आणि एका अरुंद टेबलावर काही खाण्यासाठी पदार्थ ठेवलेले असतात. अचानक तिथे एक लहान अस्वल टेबलावर चढते. टेबलावर काही पदार्थ मांडून ठेवलेले असतात. ते पाहून अस्वल ते खाण्यास सुरुवात करतो. अस्वल पदार्थ खाता खाता अलगद आई आणि चिमुकल्याकडे बघते आणि त्यांच्यावर हल्ला न करता पुन्हा अन्न खाण्यास सुरुवात करते. हे पाहून काही क्षणांसाठी तुम्हालाही भीती वाटेल. सहलीला गेलेल्या कुटुंबाचा अस्वलाशी कशा प्रकारे सामना होतो हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

crowd came watch russian dance jhansi went out of control police lathicharged video viral
Video: हा दांडिया नाही, तर सुरू आहे पोलिसांचा लाठीचार्ज; उत्तर प्रदेशात रशियन डान्सरचा शो पाहण्यासाठी तोबा गर्दी
Farmer arrives in his Audi car to sell vegetables
“कष्टाचं फळ…” भाजी विकण्यासाठी चक्क ऑडीमधून जातो ‘हा’ शेतकरी, VIRAL व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले…
mother buffalo sacrifice viral video
शेवटी आई ती आईच..! बाळाला वाचवण्यासाठी म्हशीने स्वतःचा जीव लावला पणाला, एकटी सिंहांच्या कळपाला भिडली पण…
rehman-concert-chennai
ए आर रेहमानच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, ढिसाळ नियोजन; चाहत्यांच्या सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा… भरधाव रेल्वे पकडणं तरुणाला पडलं महागात, अचानक पाय घसरला अन् रुळावर पडला, थरारक VIDEO आला समोर

व्हिडीओ नक्की बघा :

अस्वलाला पाहून आईने मुलाच्या डोळ्यांवर ठेवला हात :

जंगलातील मोठ्या प्राण्यांना बघून लहान मुलं घाबरून जातात आणि आरडाओरडा करताना दिसतात. आरडाओरडा केल्यास किंवा प्राण्यांना त्रास दिल्यास ते माणसांवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. हीच बाब लक्षात ठेवून व्हिडीओतील आईनं चिमुकल्याचा डोळ्यांवर तिचा हात ठेवला आहे; जेणेकरून तो अस्वलाला पाहून आरडाओरडा करणार नाही. तसेच यादरम्यान मुलगादेखील आईच्या कुशीत अलगद डोकं ठेवून शांत बसला आहे; जे पाहून खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Voyagefeelings या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या घटनेचं वर्णन युजरने कॅप्शनमध्ये केलं आहे आणि हा व्हिडीओ सहलीला उपस्थित असलेल्या कुटुंबातील एका सदस्यानं आपल्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे. तसेच व्हिडीओ बघता, अस्वलानं कोणालाही इजा पोहोचवली नाही; परंतु सहलीला गेलेल्या कुटुंबीयांसाठी हा भीतीदायक क्षण ठरला असेल एवढं नक्कीच.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In viral video family went on a picnic and were eating when a wild bear came asp

First published on: 01-10-2023 at 19:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×