scorecardresearch

Premium

केस मोकळे सोडून तरुणी बसली आकाशपाळण्यात अन् होत्याचं नव्हतं झालं; जत्रेतील थरारक Video

जत्रेत आकाशपाळण्यात बसल्यावर एका मुलीचे केस स्विंगमध्ये अडकतात आणि काही अज्ञात व्यक्ती मुलीचे केस कापून काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे

In Viral Video Girl Hair Stuck Inside Swing In Gujarat
(सौजन्य:इन्स्टाग्राम/@amazingdwarka) केस मोकळे सोडून तरुणी बसली आकाशपाळण्यात अन् होत्याचं नव्हतं झालं; जत्रेतील थरारक Video

Viral Video : अनेक सणांदरम्यान विविध ठिकाणी जत्रेचं आयोजन करण्यात येतं. जत्रेत लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेक व्यक्तींसाठी विविध गोष्टींचे नियोजन करण्यात येते. या जत्रांमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येतात. जत्रेत लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक खेळ, तरुणांसाठी कपड्यांची दुकाने तसेच अनेकजण त्यांच्या कौशल्याने तयार केलेल्या वस्तू स्टॉलवर मांडताना दिसून येतात आणि जत्रेत सहभागी झालेले नागरिक यांचा आनंद घेताना दिसतात. तर सोशल मीडियावर जत्रेतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. जत्रेत एका मुलीचे केस आकाशपाळण्यात बसल्यावर स्विंगमध्ये अडकतात आणि काही अज्ञात व्यक्ती मुलीचे केस सुरीने कापताना दिसतात.

जत्रेत उंच हवेत फिरणारे आकाशपाळणे पाहताच त्याच्यात बसण्याची प्रत्येकाची इच्छा होते. तर व्हायरल व्हिडीओतसुद्धा जत्रा भरली आहे. सुरुवातीला जत्रेत सहभागी झालेले काही नागरिक आकाशपाळण्यात बसतात आणि आकाशपाळणा फिरवण्यात येतो. या आकाशपाळण्यात बसलेली एक मुलगी तिचे केस मोकळे ठेवते आणि पाळणा सुरू होताच तिचे केस स्विंगमध्ये अडकतात आणि हे पाहून लगेचच आकाशपाळणा थांबवण्यात येतो. तसेच व्हिडीओत मुलीचे स्विंगमध्ये अडकलेले केस सोडवण्याचा काही माणसांच्या मदतीने प्रयत्न चालू असतो. जत्रेतील थरारक व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

sacrificing animals in public Video Viral
माणुसकीला काळीमा! सर्वांसमोर देत होता मुक्या प्राण्याचा बळी, महिलेने अडवताच दिली धमकी, धक्कादायक VIDEO व्हायरल
Girls hair gets stuck in Ferris wheel ride in fair
हौस पडली महागात! आकाशपाळण्यात अडकले तरुणीचे केस; जत्रेतील थरारक व्हिडीओ व्हायरल
dance video
“नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..” गाण्यावर आजोबांनी केला भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
G20 Stray Dogs Cruelty Beaten and Jammed in Bags Heart Drenching Video Allegations By Maneka Gandhi Reality Check
G20 साठी भटक्या कुत्र्यांसह क्रूर वागणूकीचा हृदय पिळवटून टाकणारा Video, खरी बाजू शेवटी समोर आलीच, वाचा

हेही वाचा…दोन्ही बाजूंनी घर आणि इवल्याशा चाळीतून कसा काढला बाहेर काळाचौकीचा महागणपती? थरारक VIDEO पाहून व्हाल अवाक्

व्हिडीओ नक्की बघा :

केस मोकळे सोडून बसली आकाशपाळण्यात :

आकाशपाळण्यात किंवा उंच झोपाळ्यांवर बसताना स्वतःची आणि स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्यावी असे सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा काहीजण स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत. तसंच काहीसं या व्हिडीओतील मुलीसोबतसुद्धा घडलं आहे. आकाशपाळण्यात केस मोकळे सोडून बसणं मुलीला चांगलचं महागात पडलं आहे. मुलीच्या अडकलेल्या केसांना सोडवण्यासाठी तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींनी तिला पकडून ठेवलं आहे, तर एक अज्ञात व्यक्ती मुलीचे केस सुरीने कापून काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच हे धक्कादायक दृश्य बघताना जत्रेत अनेकांची गर्दी जमली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @amazingdwarka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जत्रेत अनेकजण आकाशपाळण्याच्या समोर उभे राहून ही घटना बघताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहणारे अनेकजण आकाशपाळण्यात बसताना ‘केस मोकळे सोडून बसू नये’, असा सल्ल्ला देत आहेत; तर हा व्हिडीओ पाहून काही मुलींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच अनेकजण व्हिडीओ बघून विविध कमेंट करताना दिसून येत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In viral video girl hair stuck inside swing in gujarat asp

First published on: 29-09-2023 at 15:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×