scorecardresearch

भाजीविक्रेता रात्रीत बनला १७२ कोटींचा मालक! आता पोलिस ठाण्याच्या मारतोय चकरा; का ते जाणून घ्या

एक भाजीविक्रेता रात्रीत करोडपती बनला आहे. पण त्याला आता त्याची श्रीमंतीच डोकेदुखी बनली आहे.

Income tax department
प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावं असं वाटतं, यासाठी काही लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात. तर काहींना नशीबामुळे अचानक श्रीमंती लाभते. (Photo : Social Media, Loksatta)

प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हाव असं वाटतं, यासाठी काही लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात. तर काहींना नशीबामुळे अचानक श्रीमंती लाभते. यासाठी कोणाला लॉटरी तर कधी कोणाला एखादी ऑनलाईन गेम कारणीभूत ठरते. पण तुम्ही काहीच न करता अचानक करोडपती झालात तर…? तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. शिवाय अशा अचानक श्रीमंतीमुळे आपल्याला आयुष्यभर सुख मिळणार यात शंका नाही. पण सध्या अशाच अचानक श्रीमंत झालेल्या व्यक्तीला सुख नव्हे तर चक्क आयकर विभागाची नोटीस आली आहे. ज्यामुळे त्याच्या संकटात वाढ झाली आहे. शिवाय त्याला आता रोज पोलिस स्टेशनच्या चकरा माराव्या लागत आहेत. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

हेही पाहा- “चोर नव्हे चींधीचोर…” तरुणांनी चोरी केलेल्या घटनेचं CCTV फुटेज पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल

उत्तर प्रदेशमधील गहमर येथील एक भाजी व्यावसायिक रात्रीत करोडपती बनला पण त्याला आता रात्री शांत झोप मिळत नाहीये. हो त्याच कारण म्हणजे या व्यापाऱ्याला आयकर विभागाकडून कर न भरल्याची नोटीस मिळाल्याने त्याला धक्का बसला आहे. शिवाय त्यांच्या खात्यात एक-दोन कोटी नव्हे तर तब्बल १७२ कोटी ८१ लाख ५९ हजार १५३ रुपये आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भाजीपाला व्यापारी हे पैसे आपले नसल्याचे सांगत पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहे. शिवाय त्यांने गहमर पोलिसांमध्ये हे पैसे आपले नसल्याचं सांगितलं आहे.

आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर –

हेही पाहा- लहान भावाच्या वाढदिवसानिमित्त त्याने भाकरीवर लावली मेणबत्ती, भावनिक Video पाहूण डोळ्यात येईल पाणी

गहमर गावातील मगरराई पट्टीचे रहिवासी विनोद रस्तोगी यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर करत कोणीतरी अकाऊंटवर पैसे पाठवल्याचं सांगितलं. शिवाय याबाबत आपणाला आयकर विभागाकडून कर भरण्याची नोटीस आल्यानंतर या पैशांची माहिती मिळाली असून हे माझं खाते नाही आणि खात्यात पडलेले पैसेही माझे नाहीत असं या व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर गहमर पोलीसांनी त्याला जिल्हा मुख्यालयातील सायबर सेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात गहमर स्टेशनचे प्रभारी निरीक्षक पवनकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, हे प्रकरण सायबर क्राईमचे आहे, त्यामुळे त्या व्यापाऱ्याला आम्ही सायबर सेलकडे पाठवले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 18:02 IST