Union Budget 2023 Income Tax Memes: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्ष २०२३- २४ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यंदा मोदी सरकारकडून सर्वात मोठा दिलासा हा करदात्यांना देण्यात आला आहे. सध्या ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेले नागरिक कोणताही टॅक्स भरत नाही. ही मर्यादा ७ लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. १५.५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक पगार असणाऱ्या व्यक्तीला ५२ हजार रुपयांचा यातून फायदा होणार असेही समजत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ च्या नव्या करश्रेणीत मोठे बदल करण्यात आले आहेत जुन्या करश्रेणीत २.५ लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. मात्र आता ३ लाखांपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. तर ३ ते ६ लाख श्रेणीत ५ टक्के, ६ ते ९ लाख श्रेणीत १० टक्के, ९ ते १२ लाख श्रेणीत १५ टक्के, १२ ते १५ लाख श्रेणीत २० टक्के, १५ लाखांहून जास्त श्रेणीत ३० टक्के असे बदल करण्यात आली आहे. एकीकडे सोशल मीडियाला बजेटचे तपशील समोर येताना त्यावर मजेशीर मीम्स सुद्धा व्हायरल होत आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३: Income Tax Memes

हे ही वाचा<< Union Budget 2023-24 : एकलव्य विद्यालयांमध्ये ३८,५०० शिक्षकांची नियुक्ती, मोदी सरकार देशात १५७ नर्सिंग कॉलेज उघडणार

हे ही वाचा<< Budget 2023 : सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वाची घोषणा

हे ही वाचा<< निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये सांगितलेलं ‘श्रीअन्न’ काय आहे? Millets मुळे शरीराला होणारे फायदे जाणून घ्या

अर्थसंकल्पात आज घोषणांपैकी तुम्हाला आवडलेले व न पटलेले दोन्ही बदल कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax relief by nirmala sitharaman funny memes by netizens on less salary budget 2023 highlights svs
First published on: 01-02-2023 at 13:11 IST