शाकाहारामुळे सेक्स लाइफ चांगली होते का? या प्रश्नाचे उत्तर ब्रिटिश वर्तमानपत्र द सनच्या पत्रकार जॉर्जेट कली यांनी दिले आहे. कलीने तिचा अनुभवाबाबत सांगितले की जेव्हापासून तिने शाकाहारी आहार सुरू केला तेव्हापासून तिचे लैंगिक जीवन पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. याबाबतची सविस्तर पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

ब्रिटीश पत्रकार कली या अनुभव शेअर करत म्हणाल्या की, ‘गेल्या सहा महिन्यांपासून मी शाकाहारी आहे. शाकाहारामुळे माझ्या कंबरेची चरबीही कमी झाली आहे. माझी एनर्जी लेव्हल तसेच माझी सेक्सची इच्छा वाढली आहे. आता आम्ही दीर्घकाळ एकमेकांवर प्रेम करण्यास सक्षम आहोत. माझ्या जोडीदारही शाकाहार घेत आहे. आता तो माझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागला आहे.’ जॉर्जेट कलीने पुढे सांगितले की, एक दिवस तिने मांस खाल्ले आणि तिच्या प्रियकरासोबत गेली, पण तिथे जाताच तिला झोप लागली. कलीसोबत असे अनेकवेळा होत असे. यानंतर तिने कधीही मांसाहाराला हात लावला नाही आणि ती पूर्णपणे शाकाहारी झाली. शाकाहारामुळे सेक्सची इच्छा वाढते, हे फक्त मत नाही तर त्यामागे एक शास्त्र आहे. मुख्यतः शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे सेक्सची इच्छाही वाढते.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

पालेभाज्या, अंजीर, भोपळ्याच्या बिया, लाल मिरची, गडद चॉकलेट आणि बदाम या सर्वांमध्ये ब जीवनसत्त्वे आणि झिंक भरपूर असतात. हे टेस्टोस्टेरॉन (सेक्स हार्मोन) पातळी आणि लैंगिक इच्छा वाढवतात. त्यांच्या सेवनाने सेक्सची इच्छा वाढते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, फ्लेव्होनॉइड्स समृद्ध आहार पुरुषांमध्ये २० टक्क्यांहून अधिक इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका कमी करू शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न केल्याने आपल्या शरीरातील सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढू शकते. हा हार्मोन आपल्याला आनंदी ठेवण्यासही मदत करतो. दुसर्‍या एका संशोधनात असेही समोर आले आहे की जे लोक शाकाहारी अन्न खातात, त्यांच्या शरीराचा वास मांसाहार खाणाऱ्यांपेक्षा चांगला असतो.