झूकीपर जय ब्रूवर हे गृहस्थ सहसा विविध प्रजातींच्या प्राण्यांशी आणि त्यांच्या परस्परसंवादाचे अविश्वसनीय व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतात. त्यांनी शेअर केलेले काही व्हिडीओ केवळ आकर्षक नाहीत तर पाहण्यासाठी भीतीदायकही आहेत. जसा हा शेअर केलेला व्हिडीओ ज्यात खूप सापांचा समावेश आहे.

मी इथेच रात्र घालवणार आहे

“घरी हे करून पाहू नका, पण नेहमीप्रमाणे सर्वांचे आभार. चला आश्चर्यकारक प्राण्यांबरोबर मजा करत राहू ” त्यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ते खूप सापांनी भरलेल्या एका बंद ठींनी बसलेले दिसत आहेत. ब्रेव्हर यांनी नेटिझन्सना त्यांच्या लाईक्स आणि फॉलो केल्याबद्दल धन्यवाद देऊन व्हिडीओ सुरू केला. मग ते गंमतीने म्हणाले “मला माहित नाही काय चालले आहे पण, मला वाटते की मी इथे रात्र घालवणार आहे.”

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ शेअर केल्यापासून व्हिडीओला १.२ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत आणि ही संख्या फक्त वाढत आहे. या अप्रतिम व्हायरल व्हिडीओने लोकांना वेगवेगळ्या कमेंट्स पोस्ट करण्यास प्रवृत्त केले आहे. “खरोखर क्रेझी आणि मजेदार,” एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “सुपर क्रेझी,” दुसरा व्यक्त झाला. “तुम्ही अमेझिंग आहात,” तिसऱ्याने कमेंट केली.

पहा व्हायरल व्हिडीओ:

या व्हिडीओबद्दल तुमचे मत काय आहे?