scorecardresearch

Video: जन्मतःच बाळाचं नाव नाही Tune ठरवली जाते; भारतातील ‘या’ Whistling Village ची प्रथा आहे खूपच भारी

Budget Trips In India: या प्रथेवर अलीकडे बॉलिवूडच्या गाण्यांचाही बराच प्रभाव आहे. आवडत्या गाण्यांवरून अनेकांची नावे ठरवली जातात.

Video: जन्मतःच बाळाचं नाव नाही Tune ठरवली जाते; भारतातील ‘या’ Whistling Village ची प्रथा आहे खूपच भारी
Whistling Village Unique Baby Names (फोटो: सिद्धी शिंदे)

Unique Baby Names: आपल्याकडे एखाद्या बाळाला नाव द्यायचं म्हणजे त्यासाठी मोठी टीम बनवावी लागते. आई- वडील, आजी आजोबांची नावे एकत्र करून तर कधी आपले आवडते कलाकार, खेळाडू यांच्या नावावरून सर्वात हटके नाव निवडणे हा सध्याचा ट्रेंड आहे. मात्र भारतात एक असं गाव आहे जिथे बाळाला नाव देण्याची प्रथा तुम्ही विचारही करू शकणार नाही इतकी हटके आहे. मेघालयातील या गावाला व्हिसलिंग व्हिलेज म्हणून ओळखले जाते, इथे प्रत्येक नवजात बाळाच्या बारशाला त्याला नावाच्या आधी हे ट्यून म्हणजेच संगीत दिले जाते आणि पुढे आयुष्यभर त्याला त्याच ट्यूनने हाक मारली जाते. आहे की नाही सगळ्यात हटके?

मेघालयात बहुतांश भागात आजही मातृसत्ताक कुटुंब पद्धती असल्याने बाळाचे नाव म्हणजेच ट्यून ठरवण्याचा मान हा आईला दिला जातो. या ट्यूनवर अलीकडे बॉलिवूडच्या गाण्यांचाही बराच प्रभाव आहे. आवडत्या गाण्यांवरून अनेकांची नावे ठरवली जातात. यामागे एक विशेष कारणही आहे. चला तर जाणून घेऊयात…

व्हिसलिंग व्हिलेजचे मूळ नाव कोंगथोंग असून येथील लोक खासी जमातीचे आहेत जे खासी भाषा बोलतात. जिंगरवाई इवबेई म्हणजेच मूळ पूर्वजांच्या स्मृतीत गायले जाणारे गाणे या प्रथेनुसार प्रत्येक नवजात बालकाला नाव म्हणून ट्यून देण्याची प्रथा आहे. बारश्याच्या दिवसापासून बाळाचे कुटुंब ठराविक ट्यून वारंवार वाजवत असते त्यामुळे बाळाला त्या आवाजाची सवय होते व पुढे मोठे झाल्यावर ज्याच्या नावाची ट्यून वाजवली जाईल त्याला हाक मारल्याचे समजते. स्वतः पाहा याचे उदाहरण

Traveling Tips: ट्रेनच्या खर्चात होऊ शकतो विमान प्रवास, तिकीट बुकिंग करताना ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

कशी झाली या प्रथेची सुरुवात?

काही वर्षांपूर्वी या गावाचा अभ्यास करताना संशोधक पियाशी दत्ता यांनी सांगितले होते की, प्रत्येक कुळाचा मूळ पूर्वज असतो. प्रत्येक वेळी लहान मुलासाठी ट्यून तयार केल्यावर त्या मूळपुरुषाला आदरांजली वाहिली जाते. या प्रथेची सुरुवात काहीशी अशी झाली की, काही गुंडांशी झुंजत असताना एक माणूस झाडावर चढला होता. नाव घेतले असता पकडले जाण्याची भीती असल्याने त्यावेळी त्याने आपल्या मित्रांना हाक मारण्यासाठी शिट्टी वाजवली गुंडांना याची किंचितही कल्पना आली नाही पण मित्रांना मात्र त्याचा संकेत समजला व त्याची सुटका झाली. इथूनच पुढे अशा प्रकारे नावाच्या ऐवजी ट्यून देण्याची पद्धत सुरु झाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Incredible india meghalaya trip whistling village unique tradition of baby names as musical tune watch video svs

ताज्या बातम्या