भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना हा केवळ क्रिकेटचा सामना नसून समस्त करोडो लोकांच्या अपेक्षा दडलेल्या आहेत. भारतीय संघाच्या टी-२० वर्ल्डकपमधील भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्याला काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला असून सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. दोन्ही देशांचे चाहते नेहमीच भारत-पाक सामन्याला हाय-व्होल्टेज बनवतात. यंदाच्या महामुकाबल्यासाठी सर्व सुपरफॅन्स दुबईमध्ये जमले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन तेंडुलकरचा चाहता सुधीर गौतम आणि पाकिस्तानमधला एमएस धोनीचा चाहता मोहम्मद बशीर दुबईला पोहोचले आहेत. तसंच या सामन्याकडे जगाच्या नजरा खिळल्या आहेत. क्रिकेटप्रेमीही या मॅचसाठी अतिउत्सुक आहेत. काही क्रिकेटप्रेमींनी तर भारतानं ही मॅच जिंकावी यासाठी होम हवनचाही घाट घातलाय.

भारतीय चाहत्यांनी कशा पद्धतीने केले होमहवन व प्रार्थना पाहा छायाचित्रांतून…

भारतामध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी हवन-पूजेलाही सुरुवात झाली आहे. एएनआयच्या माध्यमातून पंजाब आणि कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये टीम इंडियाच्या विजयासाठीच्या केलेल्या हवनचे ताजे फोटोज समोर आले आहेत. भारतातील नागरिकांनी आज सकाळपासून प्रार्थना व होम हवन करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या हातात भारताचे झेंडे पकडत विजयासाठी जोरदार घोषणाबाजी केल्या.

आज संध्याकाळी ७.३० वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगणार आहे. यासाठी संपूर्ण भारत देशात उत्साह दिसून येतोय. भारताच्या विजयासाठी मुरादाबादचे क्रिकेटप्रेमींनी सुद्धा होम हवनची तयारी सुरू केलीय. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये शिव-शक्ती मंदिरात लोकांनी हे हवन केलंय. यावेळी प्रत्येकजणाच्या हातात क्रिकेटची बॅट आणि टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो दिसून आले. यावेळी लहान मुलं सुद्धा सहभागी होताना दिसून आले. हवनमध्ये पूर्णाहुतीसह टीम इंडियाच्या गौरवशाली विजयासाठी देवाला प्रार्थनाही करण्यात येतेय.

तर दुसरीकडे राजधानी पाटण्यातही वैदिक हवनाच्या माध्यमातून मंत्रोच्चारांसह भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे प्रवक्ते कृष्ण कुमार कल्लू यांनी बाल ब्राह्मणांसह संपूर्ण मंत्रोच्चारांसह वैदिक हवन करून भारताचा विजय होणारचं असा विश्वास व्यक्त केलाय. या सामन्यात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंची आणि विश्वचषक पोस्टरची पूजा करण्यात आली. त्याचबरोबर भगवान भोलेनाथची पूजा करून भारताच्या विजयासाठी प्रार्थनाही करण्यात आली.

लखनौ, कोलकाता, दिल्ली, चेन्नईमध्ये सुद्धा क्रिकेटवेड्यांनी टीम इंडियाला चिअर अप केलंय.

पाकिस्तानला हरवताना टीम इंडियानं दमदार स्कोअर उभारावा, अशी यावेळी क्रिकेटप्रेमींनी इच्छा व्यक्त केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak hawan rituals started praying for team india victory against pakistan in t20 world cup 2021 opener indian and pak superfan reaches dubai trending today photos prp
First published on: 24-10-2021 at 15:07 IST