IND Vs PAK Viral Video: आयसीसी T20 विश्वचषक २०२२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे झालेल्या ग्रुप २, सुपर १२ सामन्यात विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या शानदार खेळीमुळे भारताने मालिकेची विजयी सुरुवात केली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतीयांसाठी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातून हे खास गिफ्ट धाडले होते. या सामन्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एका पाकिस्तानी फॅनचा व्हिडीओसुद्धा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात पाकिस्तानचा झेंडा उलटा फडकवल्याने पाकिस्तानी फॅनला जोरदार ट्रोल केले जात आहे.
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून पाकिस्तानला चांगलाच टोला लगावला आहे. और इनको काश्मीर चाहीये असे म्हणत काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपण बघू शकता की व्हायरल व्हिडीओमध्ये हा पाकिस्तानी फॅन मैदानात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवताना दिसत आहे, गंमत म्हणजे आपण झेंडा उलटा धरल्याचं या अतिउत्साही चाहत्याला लक्षातही येत नाही. यानंतर प्रेक्षकातील एका व्यक्तीने त्याला झेंडा सरळ करायला सांगितल्यावर हा फॅन आपली चूक सुधारतो. खरंतर ही एक अनावधानाने झालेली चूक असू शकते पण या सामन्यातील ड्रामा पाहता हा पाकिस्तानी फॅन ऑनलाईन ट्रोल होत आहे.
Viral Video: अन त्याने भर मैदानात उलटा धरला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज
भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी विश्वचषक सामन्यात विराट कोहलीने ८२ धावांची नाबाद खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला. भारतीय गोलंदाजांनीही या सामन्यात सुंदर खेळ दाखवून दिला. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमारसहित सर्वांनीच सुरुवातीच्या १५ षटकात पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखून धरले होते. मात्र शेवटच्या ५ षटकात पाकिस्तानी फलंदाजांचा जोर दिसून आला.
जेव्हा विराट कोहली म्हणतो ‘मैं नही तो कौन बे’; IND vs PAK सामन्यातील ‘तो’ Video होतोय Viral
१६० धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर लवकर तंबूत परतल्याने भारतीय चाहत्यांची चिंता वाढवली होती. मात्र विराट कोहलीच्या तुफान खेळीने भारताने पाकिस्तानच्या हातून विजय खेचून आणला.