scorecardresearch

IND VS SL: कसोटी सामन्यादरम्यान चाहत्यांचा कोहलीसोबत सेल्फी, पोलीस आल्यानंतर विराटनं केलं असं की नेटकऱ्यांची मनं जिंकली

भारत आणि श्रीलंका यांच्यात पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणी तीन चाहते सुरक्षेचं कडं तोडत मैदानात घुसले. यापैकी एकाने विराट कोहलीसोबत सेल्फीही काढला.

Virat_Kohli
IND VS SL: कसोटी सामन्यादरम्यान चाहत्यांचा कोहलीसोबत सेल्फी, पोलीस आल्यानंतर विराटनं केलं असं की नेटकऱ्यांची मनं जिंकली (Photo-AP/Twitter)

भारत आणि श्रीलंका यांच्यात पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणी तीन चाहते सुरक्षेचं कडं तोडत मैदानात घुसले. यापैकी एकाने विराट कोहलीसोबत सेल्फीही काढला. फोटो काढण्यात यश आल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना हुसकावून लावल्यासाठी त्यांचा पाठलाग केला. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाच्या सहाव्या षटकात घडली. जेव्हा श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर दुखापतग्रस्त झाला होते. जखमी मेंडिसवर उपचार सुरू असताना स्टार खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी मिळताच तीन चाहते मैदानात घुसले आणि खेळाडूंकडे धावू लागले.

एक जण स्लिप्सवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या कोहलीच्या जवळ जाण्यात यशस्वी झाला. चाहत्याने मोबाईल काढून माजी कर्णधाराला सेल्फी घेण्यास सांगितले. कोहलीने सेल्फीसाठी होकार दिल्यावर चाहत्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी खेळाडूंच्या दिशेने धावले. तेव्हा विराट कोहली पुढे आला आणि पोलिसांकडे बोट दाखवत काहीही करू नका असे सांगितले. विराटच्या या वागण्याने सगळ्यांचीच मनं जिंकली. यानंतर सोशल मीडियावरही विराट कोहलीचे खूप कौतुक होत आहे.

मोहालीत खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीदरम्यान एका चाहत्यालाही मैदानात प्रवेश केला होता. हा सामना विराट कोहलीचा १००वा कसोटी सामना होता. हा सामना भारताने एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs sl test match fans take selfi with virat kohli video viral rmt