भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. भारताने हा सामना एकतर्फी १० गडी राखून जिंकला. सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर पोहचला होता. यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनबरोबर एक घटना घडली. यावर त्याने जी प्रतिक्रिया दिली आहे ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

भारतीय संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर पोहचला त्यावेळी ईशान किशनवर एका मधमाशीने हल्ला केला. यानंतर ईशान खूप घाबरला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी खाली झुकला. ती मधमाशी तिथून जाताच घडलेली गोष्ट कोणी पाहिली का हे बघण्यासाठी हो इतरांकडे पाहू लागला. त्याची ही प्रतिक्रिया अतिशय मजेदार होती. ईशानचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. ईशान किशन राष्ट्रगीतामध्ये पूर्णपणे मग्न होता, तेव्हा एक मधमाशी त्याच्या कानाजवळ आली आणि त्याला धक्काच बसला.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
Isreal war
गाझामधील युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रस्ताव मंजूर, ‘या’ देशाचा मात्र नकार
Dead body of tiger in suspicious condition near international cricket stadium
नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमजवळ वाघाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत अवघ्या १८९ धावांत गारद झाला. झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगिस चकाबवाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ३०.५ षटकांत लक्ष्य गाठले. शिखर धवन ८१ आणि शुभमन गिल ८२ धावा करून नाबाद परतले.

काही दिवसांपूर्वी संघाचा उपकर्णधार शिखर धवन याने ईशान किशन आणि शुबमन गिलसह एक मजेशीर व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यामध्ये त्यांची एका पंजाबी गाण्यावर डान्स केला आहे.

“हांजी बिबा, किद्दा?”, अशा कॅप्शनसह शिखरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची भरपूर पसंती मिळाली असून आतापर्यंत लाखो चाहत्यांनी व्हिडीओ लाईक केला आहे.