Baba Vanga Prediction: बल्गेरियाची रहस्यमय महिला बाबा वेंगा यांनी जगाबाबत अनेक भाकिते केली आहेत आणि त्यातील अनेक खरेही ठरली आहेत. बाबा वेंगाची आणखी एक भविष्यवाणी सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक बाबा वेंगा म्हणाले होते की भारतावर या वर्षी एक गंभीर संकट येणार आहे. हे संकट दुष्काळ किंवा उपासमारीच्या स्वरूपात येऊ शकते. बाबा वेंगाची प्रत्येक भविष्यवाणी खरी ठरली असे नाही, पण या भाकिताने भारतीयांची चिंता नक्कीच वाढवली आहे.

बाबा वेंगा यांनी २०२२ मध्ये भारतात दुष्काळ किंवा दुष्काळासारखी आपत्ती येण्याची शक्यता वर्तवली होती. बाबा वेंगा म्हणाले होते की २०२२ मध्ये भारतात टोळांचा हल्ला होऊ शकतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिके नष्ट होतील आणि भारतात उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियातील आपत्तीबद्दल सांगितले होते आणि ते खरेही ठरले जेव्हा या वर्षी जुलैमध्ये ऑस्ट्रेलियातील अनेक भागात पूर आला होता.

Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

( हे ही वाचा: लहाणपणीचे ‘करण-अर्जुन’! विराट कोहली आणि बाबर आझमच्या सेम टू सेम दिसणाऱ्या फोटोवर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया)

याशिवाय बाबा वेंगा यांनी २०२२ मध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्येबाबतही बोलले होते. हे देखील खरे ठरले आहे कारण या वर्षी प्रचंड उष्णतेमुळे पोर्तुगाल, इटलीतील अनेक शहरांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि पाण्याची भीषण टंचाई होती.

बाबा वेंगाचे अनेक भाकिते खरे ठरलेले नाहीत. बाबा वेंगा म्हणाले होते की २०१६ मध्ये युरोपमध्ये मोठी लढाई होईल आणि ती संपूर्ण महाद्वीप नष्ट करू शकते. मात्र, बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरली नाही. याशिवाय बाबा वेंगा यांनी असेही म्हटले होते की २०१० ते २०१४ दरम्यान जगात मोठे अणुयुद्ध होईल, ज्यामुळे जगाचा एक मोठा भाग संपेल, परंतु हे भाकीत देखील चुकीचे ठरले.

(हे ही वाचा: दंगल गर्ल गीता फोगटने खरेदी केली महिंद्रा स्कॉर्पिओ-एन कार; आनंद महिंद्रा म्हणाले, “आमच्यासाठी तर हा…”)

बाबा वेंगा कोण होते

बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरियामध्ये झाला होता आणि ती तिच्या भविष्यवाणीमुळे चर्चेत राहिली आहे. अवघ्या १२ वर्षांची असताना एका अपघातात तिने तिचे दोन्ही डोळे गमावले. ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही पण तिच्यात भविष्य पाहण्याची शक्ती आहे असे मानले जाते. बाबा वेंगा यांचे १९९६ मध्ये निधन झाले.