Indias First Ganpati Aagman In Mumbai 2026 Video : गणेशोत्सव २०२६ आता काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. सर्वच गणेशभक्त मोठ्या उत्साहात या सणाची वाट पाहचतायत. मुंबईत गणेश आगमनाची लगबग आता सुरु झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच देशातील पहिला गणपती आगमन सोहळा ४ जुलै २०२६ रोजी यंदा मुंबईतील बोरिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. बोरिवलीतील प्रसिद्ध सिद्धिविनायक आर्ट जाधव बंधू यांच्या कारखान्यातून पहिली श्री गणेशाची मूर्ती गुजरातमधील सुरत शहरासाठी रवाना करण्यात आली.

सुरतच्या गणेशस्वराय मंडळाची ही मूर्ती आहे. देशातील या पहिल्या गणेशमूर्तीच्या प्रस्थानावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. गजवक्र ढोलताशा पथकाच्या दमदार तालावर, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात मूर्तीचा आगमन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे मुसळधार पाऊस सुरू असतानाही हजारो गणेशभक्तांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेक तरुण मंडळी हा आनंददायी क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी जमली होती.

बोरिवली ते सुरत असा पहिल्या बाप्पाचा हा प्रवास देशभरातील गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असून यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईतील पहिला गणपती आगमन सोहळा, पाहा VIRAL VIDEOS

दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरतमधील गणेशभक्तांसाठी पहिली गणेशमूर्ती मुंबईतून रवाना झाल्याने गणेशोत्सवाची अधिकृत सुरुवात झाल्याची भावना भक्तांमध्ये पाहायला मिळाली.

सोशल मीडियावर या आगमन सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतातय.

तसेच सोशल मीडियावर आता #Ganpati2026, #GaneshFestival आणि #GanpatiBappaMorya हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

गणेशमूर्तीच्या स्वागतासाठी सुरतमध्येही विशेष तयारी करण्यात आली असून, हजारो भाविक पहिल्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

गणेशभक्तांसाठी हा सोहळा केवळ मूर्ती प्रस्थानाचा नसून श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा अविस्मरणीय उत्सव ठरला आहे. त्यामुळे २०२६ च्या गणेशोत्सवाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.