scorecardresearch

Rohit Sharma twitters favorite: दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या वादळी खेळीनं चाहत्यांची मनं जिंकली, नेटिझन्सच्या भन्नाट मिम्स ट्विटरवर व्हायरल

भारताचा बांगलादेश विरुद्ध पराभव झाला पण रोहित शर्माच्या झुंजार खेळीनंतर चाहत्यांनी भन्नाट मिम्स व्हायरल केले.

Rohit Sharma twitters favorite: दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या वादळी खेळीनं चाहत्यांची मनं जिंकली, नेटिझन्सच्या भन्नाट मिम्स ट्विटरवर व्हायरल
रोहित शर्माच्या वादळी खेळीनंतर भन्नाट मिम्स व्हायरल झाले. (image-the Indian express)

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १ विकेटनं पराभव करणाऱ्या बांगलादेशनं काल झालेल्या दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यातही बांगलादेशनं विजय संपादन केलं. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं २-० अशी आघाडी करत मालिका खिशात घातली. परंतु, कालच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने बोटाला दुखापत झाल्यानंतरही वादळी खेळी केली. फलंदाजीच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर येऊन रोहितने मैदानात षटकारांचा पाऊस पाडला. २८ चेंडूत ५१ धावांची झुंजार खेळी करून रोहितने शेवटच्या चेंडूपर्यंत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या. भारताचा पराभव झाला असला, तरी धडाकेबाज खेळीमुळं रोहित पुन्हा एकदा चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे मैदानात कोणत्या संघाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल, हे सांगता येत नाही. कालच्या सामन्यातही तसंच काहिसं घडलं. पण रोहित शर्माची चमकदार कामगिरीनं चाहत्यांनी ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बांगलादेशचा डाव सुरु असताना दुसऱ्या षटकात स्लिप मध्ये झेल घेताना रोहितच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर रुग्णालयात दाखल होण्यासाठी त्याला मैदान सोडावं लागलं. पण बांगलादेशनं दिलेलं लक्ष्य गाठण्यासाठी भारताचा डाव सुरु झाला अन् रोहितनं अखेरच्या क्षणी कमबॅक केला. भारताचा निसटता पराभव झाला, पण रोहितनं शेवटच्या क्षणापर्यंत घेतलेली लढाऊ भूमिला लाखो चाहत्यांच्या मनात घर करुन गेली. ४४ चेंडूत ६४ धावांची आवश्यकता असताना रोहितने सामना भारताच्या विजयाच्या दिशेनं खेचला होता. नऊ नंबरवर फलंदाजी करायला आलेल्या रोहितने २७ चेंडूत अर्धशतकी खेळी करुन क्रिकेट चाहत्यांना आर्श्चर्याचा धक्का दिला. परंतु, शेवटच्या षटकात मात्र ५ धावांनी भारताचा पराभव झाला.

नक्की वाचा – जंगलात भटकणारा हत्ती चक्क रुग्णालयात घुसला, डॉक्टरांनी X-ray मशिनजवळ नेलं अन् घडलं…; Viral Video पाहून थक्क व्हाल

रोहित शर्माच्या नऊ नंबरवर फलंदाजी करण्याच्या निर्णयावर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली. गावस्कर म्हणाले, रोहित शर्माची आक्रमक फलंदाजी सर्वांनाच माहिती आहे. पण जेव्हा भारत विजयाच्या जवळ होता, त्यावेळी रोहित फलंदाजी करण्यासाठी सुरुवातीला मैदानात का उतरला नाही. जर त्याला नंबर नऊवर फलंदाजी करायची होती, तर तो सातव्या नंबरवरही फलंदाजीला येऊ शकला असता.
रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीनंतर ट्विटरवर भन्नाट मिम्स व्हायरल झाले. #तुम पेहले क्यूं नही आये, अशा प्रकारचा ट्विटर ट्रेंड नेटकऱ्यांनी सुरु केला आहे. काहींनी त्यानं उशीरा फलंदाजी केल्याच्या निर्णयावर टिपण्णीही केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 12:10 IST

संबंधित बातम्या