रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरु आहे. त्यामुळे युक्रेनमधील नागरिक जीव वाचवण्यासाठी देश सोडत आहेत. आतापर्यंत हजारो लोकं या युद्धात मारले गेले आहेत. पण युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं, असं आपण ऐकलं असेलच. एकीकडे युद्ध सुरु असताना प्रेयसीला भारतात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सोशल मीडियावर प्रेमकथेची जोरदार चर्चा सुरु आहे. दिल्ली उच्च न्यायालयात वकील असलेल्या अनुभव भसीनने आपल्या प्रेयसीला संकटावर मात करत भारतात आणलं आहे.

३३ वर्षीय अनुभव भसीन आणि २९ वर्षीय एना होरोदेत्स्का एका सहलीदरम्यान भेटले होते आणि जवळपास अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. पहिला कोविड-१९ लॉकडाउन जाहीर झाला तेव्हा दोघे एकत्र प्रवास करत होते. एका आयटी कंपनीत काम करणारी एना होरोदेत्स्का उड्डाणे रद्द झाल्यामुळे भारतात अडकली होती. घरी परत जाईपर्यंत एना भारतात अनुभवच्या घरीच राहिली. अनुभव सांगितले की, ‘लॉकडाउन संपल्यानंतर आम्ही दुबईत पुन्हा भेटलो आणि मग ती भारतात आली. त्यानंतर मीही कीवला गेलो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती माझ्या कुटुंबाला भेटली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एना युक्रेनला रवाना झाली. “

Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

२४ फेब्रुवारी रोजी जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले तेव्हा एना पुढचे तीन दिवस जीव वाचवण्यासाठी आश्रयस्थानात राहिली. यानंतर एनाने पोलंडला जाण्याचा निर्णय घेतला. अनुभवने सांगितले की, “२७ फेब्रुवारीच्या रात्री लीवमध्ये राहिल्यानंतर एनाने पोलंडला जाण्याचा निर्णय घेतला. पण काही लोकं सीमेवर २४ तासांपेक्षा जास्त काळ थांबल्याची माहिती मिळाली. म्हणून तिने स्लोव्हाकियाच्या सीमेवर जाणारी बस पकडली. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तिने पायीच सीमा ओलांडली. त्यानंतर एनाला क्राको, पोलंडला जाणारी मिनीबस सापडली, जिथे ती काही आठवडे राहिली. तिथे माझे काही मित्र होते ज्यांनी तिला मदत केली आणि तिची राहण्याची सोय केली.”अनुभवने पुढे सांगितले की, “तिने पोलंडमधील भारतीय दूतावासात व्हिसासाठी अर्ज केला आणि तो मंजूर झाल्यावर भारतात आली. ती विमानतळावर येताच मी तिला प्रपोज केले.” आता जोडपे लवकरच लग्नबंधनात अडकणार असून त्यानंतर एना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणार आहेत. तिच्याकडे सध्या एक वर्षाचा व्हिसा आहे.