scorecardresearch

Premium

IND Vs NZ 2nd Test: एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीनंतर अनिल कुंबलेची जोरदार चर्चा; नेटकऱ्यांचा द्रविडला फलंदाजीचा सल्ला

एजाज पटेलने अनिल कुंबलेचा विक्रम मोडीत काढला आहे.

anil_Kumble
Ind Vs NZ 2nd Test: एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीनंतर अनिल कुंबलेची जोरदार चर्चा; नेटकऱ्यांचा द्रविडला फलंदाजीचा सल्ला

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये सुरु आहे. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने दुसऱ्या कसोटी सामना जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा मानस आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजाचा निभाव लागला नाही. एजाजने एक एक करत दहा गडी तंबूत पाठवले. एजाज पटेलने अनिल कुंबलेचा विक्रम मोडीत काढला आहे. एजाज पटेलने ४७.५ षटकं टाकत १० गडी बाद केले. यात त्याने १२ षटकं निर्धाव टाकली. तर २.४९ च्या सरासरीने ११९ धावा दिल्या. अनिल कुंबलेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका इनिंगमध्ये १० गडी बाद केले होते.

चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि आर. अश्विन यांना एजाज पटेलने खातंही खोलू दिलं नाही. भारतीय फलंदाजांची घसरगुंडी पाहता नेटकऱ्यांनी आता प्रशिक्षक राहुल द्रविडला फलंदाजीला येण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या कसोटीबाबत नेटकऱ्यांनी मजेशीर ट्वीट केले आहेत.

Ashwin vs Warner
VIDEO : अश्विनसमोर डेव्हिड वॉर्नरची ‘हिरोपंती’, बाद नसूनही माघारी परतावं लागलं, पाहा नेमकं काय घडलं?
Suryakumar Yadav's sixes video in IND vs AUS 2nd ODI Match
पावसानंतरही ‘सूर्या’ तळपला! कॅमरुन ग्रीनला ठोकले सलग ४ षटकार, ३६० डिग्री फलंदाजाचा Video पाहिलात का?
IND vs AUS 1st ODI: India win the toss and decide to bowl Ashwin-Shreyas Iyer return to the squad see playing 11
IND vs AUS 1st ODI: भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; अश्विन-श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन, पाहा प्लेईंग-११
Virat Kohli's 77th Century
IND vs PAK: किंग कोहलीने कोलंबोत ‘विराट’ शतक झळकावत मोडला एमएस धोनीचा विक्रम, राहुल द्रविडलाही टाकले मागे

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – मयंक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – विल यंग, ​​टॉम लॅथम (कप्तान), डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साऊदी, विल सोमरविले, एजाज पटेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs nz 2nd test ajaz patil bowling anil kumble in discussion rmt

First published on: 04-12-2021 at 12:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×