scorecardresearch

Premium

लग्नात बेभान नाचत होती महिला, तितक्यात ‘तो’ आला, उचलून घेताच पुढे फजिती पाहून पोट धरून हसाल

Women In Saree Falls Dancing Video: दोघांची जी काही फजिती होते ती पाहून तर तुम्हालाही हसावं की रडावं हे कळणार नाही. तुम्हीच हा व्हिडीओ प्रत्यक्ष पाहा

Indian Aunty Dancing In Wedding Wearing Saree Falls on Face As Husband Picks Her From Waist Watch Video Make You Laugh
लग्नात बेभान नाचत होती महिला, तितक्यात 'तो' आला (फोटो: इंस्टाग्राम)

Women In Saree Falls Dancing Video: तुम्ही ती म्हण ऐकली आहे का, चहापेक्षा किटली गरम? आपल्याकडील बहुतांश लग्नांमध्ये विशेषतः हळदीला नाचायला गोळा झालेल्यांची गर्दी या म्हणीचे सार्थ उदाहरण आहे. अनेकदा नवरा- नवरी त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक व मित्रांपेक्षाही काहीजण अतिउत्साहात नाचत असतात आणि मग काही वेळा हाच उत्साह चांगलाच अंगाशी येऊ शकतो. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला आहे पण अनेकांना या डान्स करणाऱ्या महिलेची काळजी सुद्धा वाटत आहे. नेमकं असं या व्हिडिओमध्ये घडलं तरी काय हे पाहूया..

तुम्ही बघू शकता की, यामध्ये एक पुरुष व एक महिला वरातीत नाचताना दिसत आहे. दोघांच्या एकापेक्षा एक मूव्हज व रोमँटिक केमिस्ट्री वरातीतील अन्य वर्हाड्यांना सुद्धा आवडल्याचे दिसतेय. ते सुद्धा सगळे या दोघांना आपल्याच धुंदीत नाचताना पाहून आनंद घेत आहेत. पण अचानक या जोड्यातील पुरुषाला काय सुचतं आणि तो त्या महिलेला उचलून घ्यायला जातो. यानंतर साडी नेसलेली ही महिला तोल न सावरू शकल्याने थेट जमिनीवरच कोसळते, पुढे दोघांची जी काही फजिती होते ती पाहून तर तुम्हालाही हसावं की रडावं हे कळणार नाही. तुम्हीच हा व्हिडीओ प्रत्यक्ष पाहा

Mahesh Gaikwad
“तो माझ्या कपाळावरुन हात फिरवून मला..” , महेश गायकवाड यांनी सांगितला रुग्णालयातला अनुभव
The Indian legend Sachin Tendulkar Entered In The Flight With His Wife Fans Chanting Sachin Sachin Watch Viral Video
निवृत्तीला १० वर्ष होऊनही सचिनची लोकप्रियता कायम; विमानात घुमला ‘सचिन… सचिन’चा नारा
Illegal bungalow destroy in Golvali near Dombivli
डोंबिवलीजवळील गोळवलीत बेकायदा बंगला भुईसपाट
Indian Aunty Dance Viral Video
Video: कसली ग्रॅव्हिटी? महिला मंडळाने साडीत केलेला ‘हा’ खतरनाक डान्स पाहून बुचकळ्यात पडले नेटकरी

Video: लग्नात अतिउत्साह नडला, साडी नेसून बाई थेट…

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेक मीम पेजेस व इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंटवर शेअर करण्यात आलं आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट लिहीत, ” मित्रांनो लग्न कितीही जवळचं असुदे असे जास्त उत्साही होऊ नका” असे लिहिले आहे. काहींनी तर फक्त “काय गरज होती” असा प्रश्न या जोडप्याला विचारला आहे. काहींनी कमेंट करताना या दोघांच्या उत्साहाचे व त्याहूनही ऊर्जेचे कौतुक केले आहे. असं मनसोक्त नाचता यायला हवं व आपल्याबरोबर अशी मजा करणारा जोडीदार मिळायला हवा अशा पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स सुद्धा या व्हिडिओवर आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian aunty dancing in wedding wearing saree falls on face as husband picks her from waist watch video make you laugh svs

First published on: 01-08-2023 at 14:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×