Indian Aunty gets Angry in Mumbai Ac Local in Rush Time Fights With Police Loco Pilot Shifts Her to Personal Cabin | Loksatta

Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “

Viral Video Today: असा कोणता प्रण ही महिला घेऊन आली होती माहीत नाही पण या हट्टामुळे शेवटी तिथे रेलवे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली, ही महिला इतकी हट्टाला पेटली होती की…

Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
लोकलच्या तुफान गर्दीत 'ती' बाई हट्ट धरून बसली, अन.. (फोटो: ट्विटर)

Viral Video Today: असं म्हणतात बाल हट्ट व स्त्री हट्ट यापुढे भलेभले झुकतात. याच म्हणीचं एक प्रत्यक्ष उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई लोकल व त्यातील गर्दीचे किस्से हे आजवर आपण अनेकदा ऐकले असतील. ट्रेनच्या डब्ब्यात माणूस सोडा नख जायला सुद्धा जागा नसली तरीही “चलो अंदर अख्खा ट्रेन खाली है” असं म्हणायचा आत्मविश्वास जगाच्या पाठीवर केवळ मुंबईकरांमध्येच दिसून येतो. बरं यात पुरुष मंडळीच नाही तर महिलाही तितक्याच आघाडीवर आहेत.. ‘समानता’ आणखी काय? पण कधी कधी हा आंधळा विश्वास व घाई हट्टाचे रूप घेते आणि मग जीवावर बेतेल अशा परिस्थितीत हे प्रवासी स्वतःला अडकवून घेतात.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका महिलेचा असाच हट्ट पाहायला मिळत आहे. एसी लोकलमधूनच घरी जाणार असा या व्हायरल व्हिडिओमधील महिलेचा हट्ट होता. जो पूर्ण होणार नाही अशी चिन्हे दिसताच या बाई प्रचंड भडकल्या.इतकं की त्यांनी मी जाईन तर याच ट्रेनने नाहीतर ट्रेनही जाऊ देणार नाही या अविर्भावात भांडण सुरु केलं. असा कोणता प्रण ही महिला घेऊन आली होती माहीत नाही पण या हट्टामुळे शेवटी तिथे रेलवे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. ही महिला इतकी हट्टाला पेटली होती कि तिने पोलिसांचंही ऐकलं नाहीच आणि मग शेवटी स्वतः लोको पायलटला केबिनमधून खाली यायला लागलं.

@mumbaimatterz या ट्विटर हॅण्डलवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. या महिलेला लोको पायलटने शेवटी आपल्या केबिनमधून प्रवास करण्याची मुभा दिली होती.

लोकलच्या तुफान गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली, अन..

हे ही वाचा<< Video: गर्दीच्या ट्रेनमध्ये ‘ती’ एकटी चढताच पुरुषांनी तोंडं लपवली; प्रत्येकासमोर जाऊन म्हणाली “तुला.. “

दरम्यान, आश्चर्याची बाब अशी की ही महिला चक्क एसी लोकलमध्ये चढण्यासाठी भांडत होती. काही महिन्यांपूर्वीची परिस्थिती पाहिल्यास या एसी लोकल अक्षरशः रिकाम्या जात होत्या पण मागील काही काळात एसी लोकलचे तिकीट दर कमी केल्याने आता एसी लोकललाही गर्दी होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 13:16 IST
Next Story
३७,००० फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडायचा म्हणून बाई हट्टाला पेटली; म्हणाली, ‘मला जीजसचा आदेश…’