भारत सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. पारा ४४ अंश पार करण्याच्या मार्गावर आहे. घरातील लोक कूलर वगैरेच्या साहाय्याने थंडावा घेत असताना, कामावर असलेले लोक सावली आणि थंड पेयांचा अवलंब करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका वरातीतला आहे जो कडक उन्हापासून वाचण्यासाठी सुरक्षित बंदोबस्त घेऊन जात आहे. वरातीतला असा जुगाड पाहून लोकही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

कडक उन्हापासून वाचण्यासाठी या वऱ्हाडी मंडळींनी हा अनोखा जुगाड वापरल्याचा हा व्हिडिओ निवृत्त एअर मार्शल एव्हिएटर अनिल चोप्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना अनिल चोप्राने लिहिले की, “कडक उन्हापासून वाचवण्यासाठी वऱ्हाडी मंडळींसाठी ही सुरक्षित जागा…” ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कडक उन्हात निघालेल्या या मिरवणुकीत नवरदेव घोड्यावर स्वार असल्याचं दिसत आहे आणि इतर वऱ्हाडी मंडळी देखील या वरातीत सामील झालेले दिसून येत आहेत.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार

वरातीत सामील झालेले सारेच जण गाण्याच्या तालावर नाचताना दिसून येत आहेत. पण वरातीत उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी चक्क सनशेड सोबत घेतली आहे. हा व्हिडीओ देशाच्या कोणत्या कोपऱ्यातील आहे हे कळू शकले नसले तरी भर उन्हात निघालेल्या वरातीच्या या अनोख्या जुगाडामुळे लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : OMG! जेव्हा कांगारू थेट बारमध्ये पोहोचला…, VIRAL VIDEO पाहून नेटिझन्सकडून कमेंट्सचा महापूर

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : फक्त माणूसच नाही तर प्राणीसुद्धा एकमेकांची मदत करतात, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

विमानचालक अनिल चोप्राने ट्विटरवर शेअर केलेल्या या अनोख्या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. एका यूजरने लिहिले की, “हा व्हिडीओ सुरतचा असेल का? मला निळ्या रंगाचा सिटीलिंक दिसतोय.” पंकज नावाच्या युजरने या अनोख्या जुगाडवर लिहिले की, आता दिल्लीतल्या वरातीत हे सुद्धा बघायला मिळतंय, नवरदेवाच्या घोडागाडीसोबत एक विंडो एसी आहे जो त्याच्या चेहऱ्यावर थंड हवा देत आहे. लग्न आणि फालतू गोष्टी भारतात नेहमीच घडतात.” एका यूजरने लिहिले की, “भारतीय म्हणजे जुगाड.” दुसर्‍या युजरने लिहिले की “आधुनिक समस्येसाठी आधुनिक उपाय आवश्यक आहे.”